शहापूर : दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी चार हजार रुपयाची लाच स्वीकारताना शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. पांडुरंग लक्ष्मण गुरव (रा. खानापूर ता. भुदरगड, जि. कोल्हापूर, मुळगाव पिरळ ता. राधानगरी) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.मिळालेली माहिती अशी, तक्रारदार यांच्या आई विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी गुरव यांनी तक्रारदार यांच्याकडे चार हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून पोलीस नाईक गुरव यास ताब्यात घेतले.
दाखल असलेल्या गुन्ह्यात मदतीसाठी घेतली लाच, शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 14:09 IST