शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर किरण लोहारची मालमत्ता जप्त होणार, पत्नी, मुलगाही पापाचे भागीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 13:16 IST

कार, प्लॉट, फ्लॅटची कागदपत्रे ताब्यात, एसीबीच्या पथकाची कारवाई

कोल्हापूर : लाचखोर शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार (वय ५०, रा. पाचगाव, ता. करवीर) याच्या पाचगाव येथील घराची झडती घेण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर आणि कोल्हापूरच्या पथकाने बुधवारी (दि. ६) रात्री उशिरापर्यंत केलेल्या कारवाईत लोहार याच्या घरातून चार लाखांची रोकड आणि मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली. यांच्या अन्य मालमत्तांवरही जप्तीची कारवाई होणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी सांगितले.लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार याची चौकशी सुरू असून, त्याच्याकडे पाच कोटी ८६ लाखांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सोलापुरात त्याच्यासह पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोहार याच्या पाचगावातील घरावर छापा टाकून झडती घेतली. या कारवाईत चार लाखांची रोकड पथकाच्या हाती लागली.

तसेच, चार कार मिळाल्या. यातील दोन कार लोहार याच्या नावावर आहेत, तर दोन कार अन्य नातेवाइकांच्या नावावर आहेत. मुंबईतील प्लॉट, पुण्यातील फ्लॅट याचीही कागदपत्रे मिळाल्याची माहिती उपअधीक्षक नाळे यांनी दिली. लोहार याने त्याच्या काही नातेवाइकांच्या नावे मालमत्ता खरेदी केल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असून, गैरमार्गाने मिळवलेली सर्व मालमत्ता जप्त केली जाईल, असे उपअधीक्षक नाळे यांनी सांगितले.

पत्नी, मुलगाही पापाचे भागीदार

लोहार याची पत्नी शिक्षिका आहे, तर मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. गैरमार्गाने मिळणारा पैसा घरात येत असल्याचे समजल्यानंतरही माय-लेकाने लोहार यांना लाच घेण्यापासून परावृत्त केले नाही. त्यामुळे या दोघांवरही गुन्हा दाखल झाल्याचे उपअधीक्षक नाळे यांनी सांगितले. एकाच्या पापाची शिक्षा संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी