दुकानात घुसून साहित्याची तोडफोड; दोघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 06:39 PM2021-02-23T18:39:29+5:302021-02-23T18:41:18+5:30

Crime News Kolhapur- दुकान गळ्यावरील ताबा सोडावा यासाठी दुकानात घुसून साहित्याची तोडफोड करून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार कसबा बावडा येथील जय हिंद पार्कमध्ये सोमवारी घडला. नुशरत शाहनूर मुजावर (वय 32), शबाना मोहम्मद तहसीलदार (दोघेही रा. कसबा बावडा) अशी जखमींची नावे आहेत.

Breaking into a shop and smashing materials; Beating both | दुकानात घुसून साहित्याची तोडफोड; दोघांना मारहाण

दुकानात घुसून साहित्याची तोडफोड; दोघांना मारहाण

Next
ठळक मुद्देदुकानात घुसून साहित्याची तोडफोड; दोघांना मारहाण महिलेसह चौघांवर गुन्हा : कसबा बावड्यातील प्रकार

कोल्हापूर: दुकान गळ्यावरील ताबा सोडावा यासाठी दुकानात घुसून साहित्याची तोडफोड करून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार कसबा बावडा येथील जय हिंद पार्कमध्ये सोमवारी घडला. नुशरत शाहनूर मुजावर (वय 32), शबाना मोहम्मद तहसीलदार (दोघेही रा. कसबा बावडा) अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित सुशांत पाटील सह चार ते पाच जणांनी जय हिंद पार्कमध्ये येऊन नुशरत मुजावर यांच्याशी वादावादी केली. माझा भाऊ प्रमोद पाटील याचा हा दुकान गाळा आहे तू दुकानगाळ्यावरील हक्क सोडला नाहीस तर तुला बघून घेईल अशी धमकी दिली.

संशयित आरोपीने दुकानात घुसून साहित्याची तोडफोड केली. तसेच नुसरत मुजावर यांच्यासह त्यांची मावशी शबाना तहसीलदार यांना मारहाण केली. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुशांत पाटील, प्रकाश पाटील, राजाराम मोरे व एका अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Breaking into a shop and smashing materials; Beating both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.