शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात येणाऱ्या अवजड वाहतूकीला शनिवारपासून ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 17:11 IST

कोल्हापूर शहरातील वाहतूकीची कोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहनांना शनिवारपासून ब्रेक लागणार आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने प्रायोगिक तत्वावर कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरात येणाऱ्या अवजड वाहतूकीला शनिवारपासून ‘ब्रेक’पोलिसांची प्रायोगिक तत्वावर कार्यवाही लक्ष्मीपुरी, शाहूपुरी व्यापाऱ्यां ना बोजा गुंडाळावा लागणार

कोल्हापूर : शहरातील वाहतूकीची कोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहनांना शनिवारपासून ब्रेक लागणार आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने प्रायोगिक तत्वावर कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे.दुसरीकडे, लक्ष्मीपुरी, शाहूपूरी या व्यापारी पेठेतील व्यापाऱ्यांना आता बोजा गुंंडाळावा लागणार असून त्यांना येथून पुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.शहरातील मध्यवस्तीमधील बाजारपेठेत व्यापारी अवजड व लहान वाहनांतून माल आणतात. त्यामुळे विशेषत : लक्ष्मीपुरी ते उमा टॉकिज मार्गावर वाहतूकीची कोंडी होते. याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होतो. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत २१३ व्यापारी सभासद आहे.

या व्यापाऱ्यांचे मात्र; शहरात गोडावून आहेत. मालाची ने-आण शहरात होते. तासन् तास अवजड वाहने याठिकाणीच थांंबून असतात.यामुळे वाहतूक कोंडी होते. समितीने शाहू मार्केटयार्ड, टेंबलाईवाडी या ठिकाणी जागा उपलब्ध करुन दिली असून सर्व मुलभूत सुविधा दिल्या आहेत; पण या जागेचा वापर व्यापारी करताना दिसत नाहीत.

यापुर्वीही व्यापाऱ्यांना टेंबलाईवाडी येथे जाण्यास पोलिस प्रशासनाने सांगितले होते. तरीही, व्यापारी येथून न गेल्याने शहरात अवजड वाहतूकीचा बोजवारा उडत आहे. या व्यापाऱ्यांना शनिवार अखेर अवजड वाहने शहरामध्ये न आणता टेंबलाईवाडीतील जागेत मालाची चढ-उतार करावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.

बाजार समितीने या दिल्या सुविधा...

  1. आर्म गार्ड
  2. पोलिस चौकी
  3. पाणी, वीज सुविधा
  4. संरक्षक भिंती केल्या भक्कम
  5. विद्युत कनेक्शनसाठी समितीकडून तत्काळ ‘ना हरकत प्रमाणपत्र’

 

बाजार समितीने आता मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे सात किंवा आठ जानेवारीपर्यत लक्ष्मीपुरीतील व्यापारी टेंबलाईवाडी येथे स्थलांतर होतील. पण ; केवळ अवजड वाहतूकीची कोंडी फक्त लक्ष्मीपुरीमुळे होते असे नाही. इतरत्र ठिकाणीही अवजड वाहनामुळे होते.-वैभव सावर्डेकर, माजी अध्यक्ष, लक्ष्मीपुरी ग्रेन मर्चंट असोसिएशन.

अवजड वाहतूकीबाबत शनिवारपासून प्रबोधन करणार आहे. १५ दिवस प्रायोगिक तत्वावर ही कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानंतर सूचना व हरकती लक्षात घेऊन याची अंमलबजावणी टप्प्याटप्याने करण्यात येणार आहे.-अनिल व्ही.गुजर, पोलीस निरीक्षक , वाहतूक शाखा,कोल्हापूर.

 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस