शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णय निघेपर्यंत कामकाजावर बहिष्कार;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वेतन रचनेमधील दुरुस्तीचा शासन निर्णय काढला जात नाही, तोपर्यंत विद्यापीठाच्या कॅस प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : वेतन रचनेमधील दुरुस्तीचा शासन निर्णय काढला जात नाही, तोपर्यंत विद्यापीठाच्या कॅस प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा प्राचार्य असोसिएशनने घेतला. येथील न्यू कॉलेजमध्ये ही बैठक झाली. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष प्राचार्य आर. डी. पाटील वडगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

प्राचार्यांच्या सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील वेतन रचनेमधील दुरुस्तीबाबत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. परंतु शासन निर्णय निघणे महत्त्वाचे आहे. महाविद्यालयात अद्याप सीएचबी शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आलेल्या नाहीत. त्याबाबत विद्यापीठाने व शासनाने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री सामंत यांनी जो उपक्रम राबवला तो चांगला होता. त्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. परंतु अजूनही प्रलंबित प्रश्नांबाबत ठोस भूमिका घेऊन ते सोडविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. लीड कॉलेज योजनेंतर्गत महाविद्यालयांना परीक्षा देण्याचे काम दिले आहे, त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. असोसिएशनच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेतील अनेक घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत होते. यासाठी संस्थाचालक व प्राचार्य असोसिएशनने एकत्र राहून विद्यापीठ कार्यक्षेत्रात गुणवत्ता वाढीसाठी चांगले उपक्रम सुरू करता येतील अशी अपेक्षा आर. डी. पाटील यांनी व्यक्त केली. चर्चेत प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, डॉ. मंगलकुमार पाटील, डॉ. प्रवीण चौगले, डॉ. युवराज भोसले, सी. आर. गोडसे, डॉ. डी. आर. मोरे, डॉ. सुरेश गवळी आदींनी भाग घेतला.

पदवीप्रदान समारंभ नकोत..

पदवीप्रदान समारंभाच्या आयोजनासाठी जोपर्यंत महाविद्यालयांना भरघोस निधी दिला जात नाही, तोपर्यंत महाविद्यालयामध्ये पदवी प्रदान समारंभ आयोजित न करण्याचा निर्णयही बैठकीत झाला.

२९०१२०२१-कोल-प्राचार्य बैठक

कोल्हापूर जिल्हा प्राचार्य असोसिएशनची बैठक नुकतीच न्यू कॉलेजमध्ये झाली. त्यामध्ये प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, डॉ. मंगलकुमार पाटील, डॉ. प्रवीण चौगले, डॉ. युवराज भोसले, सी. आर. गोडसे, डॉ. डी. आर. मोरे, डॉ. सुरेश गवळी आदी उपस्थित होते.