शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या सेवेसाठी रुग्णालयात थांबला, झोपेतच मुलाचा मृत्यू झाला; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 15:58 IST

एकमेकांना अधार असलेल्या माय-लेकाला हृदयविकाराने गाठले. यातच मुलाचा मृत्यू

कोल्हापूर : हृदयविकाराचा झटका आलेल्या आईच्या सेवेसाठी सीपीआरमध्ये थांबलेला मुलगा संतोष मनोहर गवरे (वय ४५, रा.कसबा बावडा, कोल्हापूर) यांचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २०) सकाळी नऊच्या सुमारास सीपीआरमधील वेदगंगा इमारतीजवळ उघडकीस आली. आईची काळजी करणाऱ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, कसबा बावड्यातील संकपाळनगरात राहणाऱ्या लीलाबाई मनोहर गवरे (वय ६५) यांना सोमवारी (दि. १९) सकाळी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. अस्वस्थ वाटू लागल्याने, मुलगा संतोष यांनी आईला सीपीआरमध्ये दाखल केले. बहिणीसोबत संतोष आईची शुश्रूषा करीत होते. सोमवारी रात्री त्यांनी स्वत:च्या हाताने आईला जेवू घातले. त्यानंतर, ते वेदगंगा इमारतीजवळ मुकादम कार्यालयाजवळ झोपी गेले. सकाळी नऊ वाजले, तरी ते उठले नसल्याने, सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने, त्यांना सीपीआरच्या अपघात विभागात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.संतोष यांचे लग्न झाले नव्हते, त्यामुळे आई आणि ते असे दोघेच घरात राहत होते. एकमेकांना अधार असलेल्या माय-लेकाला हृदयविकाराने गाठले. यात मुलगा संतोष यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटलHeart Attackहृदयविकाराचा झटकाDeathमृत्यू