निधन महत्वाचे दोन्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:50 IST2020-12-11T04:50:29+5:302020-12-11T04:50:29+5:30
कोल्हापूर : येथील दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ल. रा. नसिराबादकर यांच्या पत्नी मंदाकिनी लक्ष्मण नसिराबादकर (वय ८२) यांचे ...

निधन महत्वाचे दोन्ही
कोल्हापूर : येथील दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ल. रा. नसिराबादकर यांच्या पत्नी मंदाकिनी लक्ष्मण नसिराबादकर (वय ८२) यांचे बुधवारी निधन झाले. प्रा. डॉ. सुनीता लेंगडे आणि हेमंत मुद्रणालयचे सुनील नसिराबादकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शुक्रवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे.
फोटो : नावाने पाठवला आहे.
सराफ व्यावसायिक उदयराव माने यांचे निधन
कोल्हापूर : येथील गुजरीतील प्रसिद्ध माने ब्रदर्स सराफ पेढीचे मालक उदयराव दत्ताजीराव माने (वय ७३, रा. रमणमळा परिसर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. जयदीप माने यांचे ते चुलते होत. अंधशाळा, अनाथाश्रम यांना मदतीच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात सक्रिय होते. कोल्हापूर सराफ व्यावसायिक संघाचेही ते सदस्य होते.
फोटो : उदय दत्ताजीराव माने-निधन