कोल्हापुरात दोन्ही काँग्रेसमध्ये रस्सीखेच
By Admin | Updated: February 23, 2017 13:06 IST2017-02-23T13:06:47+5:302017-02-23T13:06:47+5:30
भाजप जनसुराज्य व ताराराणी आघाडी किती आघाडी होणार याकडे आता लक्ष

कोल्हापुरात दोन्ही काँग्रेसमध्ये रस्सीखेच
कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेच्या एकूण ६७ जागांपैकी २० निकाल जाहीर झाले असून दोन्ही काँग्रेसमध्ये नंबर वनसाठी रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही काँग्रेसने प्रत्येकी पाच जागांवर विजय मिळविला आहे. शिवसेना ४जागांवर विजयी झाले आहे, तर भाजपला केवळ २ जागांवर यश मिळाले आहे. स्थानिक आघाड्यांना पाच जागांवर यश मिळाले आहे. काँग्रेसच्या पाठोपाठ शिवसेना यश मिळविताना दिसत असून स्थानिक आघाड्यांनाही चांगले यश मिळत असल्याचे चित्र पुढे येत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काँग्रेसचे उमेश आपटे यांनी केवळ ३० मतांनी खळबळजनक विजय नोंदविला आहे. शिवसेनेपाठोपाठ तीन जागा मिळवित विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षानेही पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप जनसुराज्य व ताराराणी आघाडी किती आघाडी होणार याकडे आता लक्ष आहे.