शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बोरखिंड धरण ओव्हरफ्लो

By admin | Updated: August 1, 2014 01:07 IST

बोरखिंड धरण ओव्हरफ्लो

 

पांढुर्ली : सिन्नर तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यातील औंढेवाडी डोंगररांगेत सलग तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे बोरखिंड धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पश्चिम भागात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून संततधार सुुरू असल्याने धरणसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. औंढेवाडी पट्ट्यात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे बोरखिंड धरण ओव्हरफ्लो झाले. यावर्षी तब्बल दीड महिना पावसाळा लांबल्यामुळे बोरखिंड धरणाने तळ गाठला होता. या धरणातून पाच गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. यावर्षी धरणाने तळ गाठल्याने सदर योजना संकटात सापडली होती. जुलै महिन्यात या योजनेचे पाणी कमी झाल्याने दररोज करण्यात येणारा पाणीपुरवठा आठ दिवसाआड झाला होता. धरण ओव्हरफ्लो झाल्याने शिवडा, बोरखिंड व घोरवड या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. बोरखिंड धरणामुळे बोरखिंडसह पांढुर्ली, शिवडा व आगासखिंड या गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी फायदा होतो. या भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. यावर्षी पावसाळा लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र औढेवाडी डोंगररांगेत सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण तुडूंब भरून वाहू लागले आहे. दरम्यान, पांढुर्लीसह घोरवड, शिवडा, विंचूरदळवी, आगासखिंड, बेलू, बोरखिंड या गावांसह सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत असल्याने नदी-नाले वाहू लागले आहेत. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना संजीवनी मिळणार आहे. सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतीकामांना वेग येईल. (वार्ताहर)