शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: अखेर 'त्या' बोगस डॉक्टरला अटक, महिलांशी लगट करून बनवायचा अश्लील चित्रफीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 14:05 IST

या चित्रफिती व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती

मुरगूड : येथील महिलांशी लगट करून गैरवर्तन करत त्यांच्या चित्रफिती बनवणारा बोगस डॉक्टर दत्तात्रय शामराव कदम याला बुधवारी कागल पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. दरम्यान आपल्याला अटक होऊ नये यासाठी या डॉक्टरने मोठी फिल्डिंग लावली होती; पण शेवटी जनरेट्याने त्याला अटक करावी लागली.दत्तात्रय कदम हा गेल्या अनेक वर्षांपासून मुरगूड, ता. कागल येथे आयुर्वेदिक औषधे देऊन रुग्णांच्या जखमा बऱ्या करत होता. राज्य परराज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत होते. दवाखान्यात येणाऱ्या महिला रुग्णांशी जवळीक करून त्याने अनेकांशी लैंगिक संबंध प्रस्थापित करत त्याच्या चित्रफिती तयार केल्या होत्या. या चित्रफिती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने याची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली होती.याबाबत कोणीच तक्रार देण्यास पुढे येत नव्हते; पण शहरातून सदर चित्रफीत व्हायरल होत होती, तसेच अश्लील फोटोही व्हायरल झाले. शेवटी तीन महिन्यांपूर्वी पोलिसांनी या बोगस डॉक्टरला अटक करावी यासाठी नागरिकांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला होता. त्यात मुरगूडचे सपोनि विकास बडवे यांनी स्वतः फिर्यादी होत तक्रार दिल्यानंतर या दत्तात्रय कदम यावर गुन्हा नोंद झाला होता. कदम याने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते; पण त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. आज कागलचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी त्याला अटक झाल्याची माहिती दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी