शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या अकादमीची बोगसगिरी

By admin | Updated: September 7, 2016 01:14 IST

नाशिक सैन्य भरती : बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप

सिडको (नाशिक): सांगली जिल्ह्यातील एका अकादमीच्या माध्यमातून सर्व वैयक्तिक पुराव्याची कागदपत्रे नाशिक जिल्ह्यामधील असल्याचे दाखवून बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांचा जागरूक नागरिकांमुळे पर्दाफाश झाला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्याच्या सैन्य भरती प्रक्रियेपुढे पुन्हा बनावट कागदपत्रांचे आव्हान कायम राहणार आहे. याबाबत अंबड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी (दि.९) होणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या सैन्य भरतीसाठी सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या शहरांमधून सुमारे तीनशेहून अधिक तरुण नाशिकचे रहिवासी असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून सिडकोच्या संभाजी स्टेडिअमवर सोमवारी मध्यरात्रीपासून मुक्कामाला होते. जिल्ह्यातील तरुणांसाठी असलेल्या सैन्य भरतीमध्ये हे तरुण बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये होते. तीनशे तरुणांचा जत्था सोमवारपासून मंगळवारी रात्री आठ वाजेपासून मैदानावर तळ ठोकून होता. यावेळी तरुणांनी दिवसभर मैदानावर सरावही केला. सायंकाळच्या सुमारास सिडको, अंबड, सातपूर भागातील काही तरुण सरावासाठी मैदानावर पोहचले त्यावेळी सैन्य भरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांची एवढी मोठी संख्या पाहून ते चक्रावले. त्यांच्यापैकी काहींनी नगरसेवक शीतल भामरे, संजय भामरे यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. दरम्यान, बाहेरगावाहून आलेल्या तरुणांना याबाबत कुणकुण लागल्याने त्यांनी हळूहळू मैदान सोडण्यास सुरुवात केली. स्थानिक व बाहेरगावाहून आलेल्या तरुणांमध्ये वादविवाद घडण्याची शक्यता भामरे यांनी अंबड पोलिसांकडे भ्रमणध्वनीवरून व्यक्त केली. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी स्टेडिअम गाठले; मात्र तोपर्यंत बाहेरगावाहून बनावट कागदपत्रे घेऊन सैन्याच्या भरतीसाठी आलेले सर्व तरुण पसार झाले होते. अंबड पोलीस ठाण्याचे पथक त्यांचा शोध घेत आहेत. (वार्ताहर ) स्टेडिअममध्ये प्रवेश मिळाला कसा ?सोमवारी मध्यरात्री आलेल्या अडीचशे मुलांच्या जमावाला मुक्कामासाठी मैदानात प्रवेश मिळाला कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत या तरुणांकडून पालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी शुल्कदेखील वसूल केलेले नव्हते.