शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात शिवाजी पुलावरून नदीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, इन्स्टावर लाइव्ह येऊन केले होते कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:28 IST

नातेवाइकांनी फोडला हंबरडा

कोल्हापूर : फोन करून मित्रांना इन्स्टावर लाइव्ह येण्याचे सांगून शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी घेतलेला हर्षवर्धन विजय सुतार (वय २१, मूळ रा. वरणगे पाडळी, ता. करवीर, सध्या रा. राजोपाध्येनगर, कोल्हापूर) याचा मृतदेह रविवारी (दि. २२) सकाळी अकराच्या सुमारास सापडला. त्याने शनिवारी दुपारी पुलावरून उडी मारली होती. अग्निशमन दलाचे जवान आणि करवीर पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीने मृतदेह शोधून बाहेर काढला.हर्षवर्धन सुतार हा शहरातील एका महाविद्यालयात ‘बीबीए’चे शिक्षण घेत होता. आईचे निधन झाल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून तो राजोपाध्येनगर येथे मामाकडे राहत होता. शनिवारी दुपारी तो त्याच्या दुचाकीवरून शिवाजी पुलावर पोहोचला. कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींना फोन करून त्याने इन्स्टावर लाइव्ह यायला सांगितले. त्यानंतर आत्महत्या करीत असल्याचे सांगत त्याने पुलावरून नदीत उडी घेतली होती.हा प्रकार समजताच अग्निशमन दलाचे जवान आणि करवीर पोलिसांकडून हर्षवर्धनचा शोध सुरू होता. शनिवारी सायंकाळी अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबवली होती. रविवारी सकाळी दहापासून पुन्हा शोधमोहीम सुरू केली. पाणबुड्यांच्या मदतीने शोध सुरू असताना सकाळी अकराच्या सुमारास पुलाजवळ नदीत मध्यभागी त्याचा मृतदेह सापडला. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.

नातेवाइकांनी फोडला हंबरडाहर्षवर्धनचे वडील, मामा, मामी, आजी यांच्यासह मित्र-मैत्रिणी रविवारी सकाळपासूनच शिवाजी पुलावर पोहोचले होते. त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. कौटुंबिक वाद किंवा नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस