बेपत्ता महिलेचा मृतदेह पंचगंगा नदीत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:29 IST2021-08-24T04:29:50+5:302021-08-24T04:29:50+5:30

इचलकरंजी : येथील गावभाग परिसरातील बेपत्ता महिलेचा मृतदेह पंचगंगा नदीत सोमवारी सायंकाळी आढळून आला. विजया श्रीकांत पोतदार (वय ५५, ...

The body of a missing woman was found in the Panchganga river | बेपत्ता महिलेचा मृतदेह पंचगंगा नदीत आढळला

बेपत्ता महिलेचा मृतदेह पंचगंगा नदीत आढळला

इचलकरंजी : येथील गावभाग परिसरातील बेपत्ता महिलेचा मृतदेह पंचगंगा नदीत सोमवारी सायंकाळी आढळून आला. विजया श्रीकांत पोतदार (वय ५५, रा. खाड पाटील गल्ली) असे त्या महिलेचे नाव असून शुक्रवार (दि.२०) पासून बेपत्ता होत्या. या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत माहिती अशी, विजया पोतदार या घराशेजारी यंत्रमाग कारखान्यात मशीनवर काम करीत होत्या. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घरात कोणास काहीही न सांगता निघून गेल्या. त्यामुळे विजया बेपत्ता झाल्याची वर्दी महेश पोतदार यांनी गावभाग पोलिसात दिली. नातेवाइकांसह सर्वत्र शोध घेऊनही त्या आढळून आल्या नाहीत. गेल्या चार दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, सोमवारी यळगुड (ता.हातकणंगले) येथील अल्पवयीन बेपत्ता मुलीचा शोध घेत असताना पंचगंगा नदीच्या पुलापासून पात्रात पुढे दोन किलोमीटर अंतरावर विजया पोतदार यांचा मृतदेह मिळाला. पालिकेच्या आपत्कालीन पथकाने मृतदेह पाण्याबाहेर काढले. त्यानंतर नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातू असा परिवार आहे.

फोटो ओळी

२३०८२०२१-आयसीएच-०१-विजया पोतदार

Web Title: The body of a missing woman was found in the Panchganga river