शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा नदीत बुडालेल्या दोघा मुलांचे मृतदेह सापडले, इचलकरंजीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 12:39 IST

बुडत असलेल्या एकास वाचविण्यासाठी गेला; परंतु दोघेही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीत बुडालेल्या दोघा मुलांचे मृतदेह शुक्रवारी सापडले. महापालिकेच्या आपत्कालीन पथकाने पट्टीचे पोहणारे अनिल पाटोळे यांना सोबत घेऊन तब्बल बारा तास शोधमोहीम राबवून मृतदेह शोधून काढले. त्यातील एका मुलाचे नाव तन्मय तुषार सपकाळ (वय १५, रा. मुंबई) असे आहे, तर घटनेला ३५ तास उलटले तरी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या मुलाची ओळख पटली नाही. त्याच्या नातेवाइकांचा शिवाजीनगर पोलिस शोध घेत आहेत.मुंबईचा तन्मय हा सुटीसाठी इचलकरंजीतील मामाकडे आला होता. गुरुवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास तो मित्रांसोबत पंचगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवाह गतिमान होता. तेथे एक बारावर्षीय मुलगा नदीपात्रात बुडत असल्याचे पाहून तन्मय हा त्याला वाचविण्यासाठी तेथे गेला; परंतु दोघेही प्रवाहाबरोबर वाहून गेले. दोघांना बुडताना पाहून अन्य मित्रांनी आरडाओरड केली. त्यानंतर महापालिकेच्या आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे, शिवाजीनगरचे तेजस कांबळे यांनी गुरुवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत यांत्रिक बोट घेऊन शोधमोहीम राबवली; परंतु दोघेही आढळले नाहीत. अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबवून शुक्रवारी सकाळी सहा वाजता पुन्हा शोधमोहीम सुरू केली. संजय कांबळे यांच्यासह पथकातील सुखदेव जावळे, आकाश आवळे, शाखानंद कांबळे, शीतल ज्योती, अजय कांबळे व पट्टीचे पोहणारे पाटोळे यांनी शुक्रवारी दिवसभर तब्बल बारा तास पंचगंगा नदीत शोध घेतला. सकाळी पहिल्या टप्प्यात बारावर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता तन्मयचा मृतदेह सापडला. शवविच्छेदनानंतर तो नातेवाइकांच्या ताब्यात दिला.दरम्यान, दुसऱ्या बारावर्षीय मुलाचा मृतदेह सकाळी सापडल्यानंतर त्याच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचे काम शिवाजीनगर पोलिसांनी सुरू केले. फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला, तसेच परिसरातील सर्व पोलिस ठाण्यांतही मुलगा हरवल्याची तक्रार नोंद झाली आहे का, याची तपासणी केली; परंतु ३५ तास उलटले तरी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मुलाच्या नातेवाइकांचा शोध लागला नाही. त्याचा मृतदेह आयजीएम रुग्णालयात शवपेटीत ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणेriverनदीDeathमृत्यू