शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूच्या डासांनी शोषला कोल्हापूर जिल्ह्याचा रक्तसाठा; रुग्णांची हेळसांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 19:31 IST

डेंग्यूच्या साथीने प्लेटलेटसच्या मागणीत वाढ : ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण संख्येत वाढ

कोल्हापूर : उन्हाळी सुटीमुळे रक्तदान शिबिरांची संख्या रोडावल्याने जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता आहे. त्यातच यंदा पावसाने लवकर हजेरी लावल्याने साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. डेंग्यूचे रुग्ण वाढल्याने प्लेटलेटसह संपूर्ण रक्ताच्या मागणीत वाढ झाली आणि पुरवठा कमी असल्याने रुग्णांची हेळसांड होऊ लागली आहे.प्रत्येक वर्षी मे महिन्यात रक्ताची टंचाई भासते. मात्र, जून मध्ये पुन्हा रक्तपेढ्या फुल्ल हाेतात. यंदा, मान्सून लवकर सुरु झाल्याने साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त आहेत. त्यात, अद्याप शाळा, महाविद्यालयांना सुटी असल्याने रक्तदान शिबिरे कमी प्रमाणात होत आहेत. याचा एकत्रित परिणाम रक्त संकलनावर झाला आहे.

सध्या पावसाची उघडझाप सुरु आहे. त्यामुळे साथीचे आजार डोकेवर काढत आहेत. ताप, सर्दी, खोकला, जुलाब, अतिसार, उलट्या होणे, पावसाळ्यातील विषाणूजन्य व्याधी म्हणजे मलेरिया, हिवताप, स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनिया, कावीळ, कॉलरा. तसेच सांधेदुखी, अस्थमा, आमवात, पचनाचे आजार, आम्प्लपित्त यासारख्या जुनाट व्याधीदेखील डोके वर काढू लागल्या आहेत.जिल्ह्यातील सामाजिक संस्था, तरुण मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन गरजू रुग्णांना रक्त वेळेत उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सीपीआर रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या वतीने करण्यात आले आहे.

सीपीआरच्या रक्तपेढीत ९७ पिशव्यासीपीआर रुग्णालयात रोज शेकडो रुग्ण दाखल होतात. यामध्ये विविध साथीच्या आजारांसह अपघातग्रस्तांची संख्याही लक्षणीय असते. या रुग्णांना रक्ताची गरज असते, पण ‘सीपीआर’च्या रक्तपेढीत केवळ ९७ पिशव्या रक्त आहे.‘निगेटीव्ह’ रक्तच मिळेनाबहुतांशी रक्तपेढ्यांमध्ये ‘ए निगेटीव्ह’, ‘बी निगेटीव्ह’, ‘ओ निगेटीव्ह’, ‘एबी निवेटीव्ह’ या गटातील रक्तच नाही. त्यामुळे हे रक्तगट असणाऱ्या रक्तदात्यांनी स्वत:हून रक्त द्यावे, असे आवाहन रक्तपेढ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सीपीआर रक्तपेढीतील शिल्लक रक्त

रक्त गट  - व्होल रक्त - पीसीव्ही  - एकूण - एफएफपीए पॉझिटिव्ह  - ०२  - ०९  - ११ - ११ए निगेटीव्ह   - ००  - ००  - ००  - ००बी पॉझिटिव्ह - ००- ०७  - ०७ - ०४बी निगेटीव्ह -  ००- ०४ - ०४ - ००ओ पॉझिटिव्ह -  ०० - १७  -१७ - ५९ओ निगेटीव्ह - ०० - ०३  - ०३  - ०७एबी पॉझिटिव्ह - ०० - ०५  - ०५  - १५एबी निगेटीव्ह -  ०० -  ०० -  ०० - ०१