वारणा दूध संघात रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST2020-12-15T04:39:26+5:302020-12-15T04:39:26+5:30
तात्यासाहेब कोरे यांच्या प्रतिमेचे पूजन व शिबिराचे उद्घाटन कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांचे हस्ते झाले.अर्पण रक्तपेढी,कोल्हापूरचे डॉ.गाडवे व त्यांच्या ...

वारणा दूध संघात रक्तदान शिबिर
तात्यासाहेब कोरे यांच्या प्रतिमेचे पूजन व शिबिराचे उद्घाटन कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांचे हस्ते झाले.अर्पण रक्तपेढी,कोल्हापूरचे डॉ.गाडवे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत रक्त संकलन करण्यात आले. शिबिरात १०१ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. संघातील कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला.
यावेळी रक्तदान केलेल्या कामगारांना संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांचे हस्ते प्रशस्तिपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संघाचे संचालक शिवाजी जंगम, आर. ॲन्ड डी. विभागाचे एच. एन. देसाई, पर्सोनेल मॅनेजर बी. बी. चौगुले,अकौंटस् मॅनेजर सुधीर कमेरीकर, शेती विभागप्रमुख अशोक पाटील, डेअरी मॅनेजर आर. बी. महाजन, पशुखाद्य विभागप्रमुख प्रकाश पाटील, स्टोअर विभागाचे अभिजीत भोसले, टाईम ऑफिसचे स्वतंत्रकुमार कानडे, अनिल लंबे, संतोष पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
..........................................
फोटो.
फोटो ओळी : वारणानगर : सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांचे २६ व्या पुण्यतिथीनिमित्त संघाच्या प्रशिक्षण केंद्रात आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना भेटवस्तू प्रदान करताना कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, बी. बी. चौगुले, रामचंद्र जाधव आदी.