शिंगणापूर येथे रक्तदान शिबिर, फळवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:18 IST2021-06-05T04:18:23+5:302021-06-05T04:18:23+5:30

कोपार्डे - कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यातील रक्तसाठा कमी होत आहे. अनेक रुग्णांना या काळात रक्त मिळविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना त्रास ...

Blood donation camp at Shinganapur, fruit distribution | शिंगणापूर येथे रक्तदान शिबिर, फळवाटप

शिंगणापूर येथे रक्तदान शिबिर, फळवाटप

कोपार्डे - कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यातील रक्तसाठा कमी होत आहे. अनेक रुग्णांना या काळात रक्त मिळविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत असल्याने सामाजिक बांधिलकी समजून शिंगणापूर येथे सरपंच प्रकाश रोटे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ९१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याचबरोबर शिंगणापूर व कुंभी कासारी कारखान्यावरील डी.सी नरके विद्यानिकेतन येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना फळवाटप करण्यात आले

यावेळी करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, जि.प. सदस्य सुभाष सातपुते, रफीक पठाण, रिंकू देसाई, सचिन भोळे, सतीश चौगले, बबन सावरे, अशोक पाटील, संदीप पाटील, गणेश वासुदेव, नितीन गवळी उपस्थित होते

फोटो

शिंगणापूर त. करवीर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, सरपंच प्रकाश रोटे व इतर.

Web Title: Blood donation camp at Shinganapur, fruit distribution