सरुडमध्ये रविवारी ‘लोकमत’तर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:17 IST2021-07-10T04:17:01+5:302021-07-10T04:17:01+5:30

सरुड : ‘लोकमत’चे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी तथा बाबुजी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ...

Blood donation camp by Lokmat on Sunday in Sarud | सरुडमध्ये रविवारी ‘लोकमत’तर्फे रक्तदान शिबिर

सरुडमध्ये रविवारी ‘लोकमत’तर्फे रक्तदान शिबिर

सरुड : ‘लोकमत’चे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी तथा बाबुजी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘लोकमत नातं रक्ताचं’ या उपक्रमांतर्गत सरूड (ता. शाहूवाडी) येथे रविवार, दि. ११ जुलै रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिव - शाहू फाऊंडेशन, शाहूवाडी, शिवाजी रोडे - पाटील गृहतारण सह. संस्था व सरूड येथील फ्रेंडस् तरूण मंडळाच्या पुढाकारातून व सहकार्यातून हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार सत्यजित पाटील - सरूडकर यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील, सभापती विजय खोत, उपसभापती दिलीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

येथील देवांग कोष्टी समाजाच्या चौंडेश्वरी मंदिर सभागृहामध्ये सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत हे शिबिर पार पडणार आहे. कोरोनासारख्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये रक्त टंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदानाव्दारे आपली सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन शिव - शाहू फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय जगताप व शिवाजी रोडे - पाटील गृहतारण सह. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हेमंत भालेकर यांनी केले आहे. यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे शाहूवाडी तालुकाध्यक्ष (थोरात गट) शिवाजी रोडे - पाटील, विक्रम पोतदार, फ्रेंडस् तरुण मंडळाचे तुषार दिवसे, देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण सातपुते, आदी उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp by Lokmat on Sunday in Sarud