शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा कोल्हापुरात बकऱ्यांसह रास्ता रोको; आंदोलनकर्त्यांनी दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 12:23 IST

कोल्हापूर : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती या प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी सकल धनगर समाजाने पुणे-बंगळुरु महामार्गावरील तावडे हॉटेल ...

कोल्हापूर : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती या प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी सकल धनगर समाजाने पुणे-बंगळुरु महामार्गावरील तावडे हॉटेल चौकात सोमवारी बकऱ्यांसह तासभर रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळासाठी वाहतुकीची कोंडी झाली. प्रवर्गात समावेश न केल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासह येत्या विधानसभा निवडणुकीत आरक्षण न देणाऱ्या लोकांना योग्य जागा दाखवू, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.पंढरपूर येथे सुरू असलेल्या सकल धनगर समाजाच्या आमरण उपोषणाचा पंधरावा दिवस असून, सर्व सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे. मात्र अद्याप सरकारकडून कोणतेच ठोस पाऊल न उचलल्याने सोमवारी राज्यभरात ठिकठिकाणी धनगर समाजाकडून रास्ता रोको झाला. यावेळी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगर समाजामुळेच मी आमदार झालो. सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा सर्वत्र गाजत आहे. समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही आमची मागणी आहे. सरकारच्या बाजूने समाज उभा राहिला. मात्र आरक्षण मिळाले नाही. केवळ मतदानासाठी समाजाची गरज असल्याचे दिसते. त्यामुळे अनुसूचित जातीचे परिपत्रक तत्काळ काढावे. समाजातील मुले शिकली तरी त्यांना मेंढरे सांभाळण्याची वेळ येणार नाही. समाजाकडे कोणतेही साखर कारखाने नसल्यानेच आरक्षणाची मागणी आहे. केवळ दोन नेत्यांच्या सूतगिरण्या सोडल्या तर आमच्या समाजाचा चेअरमन दाखवा, असे आव्हानही त्यांनी केले.यावेळी आंदोलनकर्त्यांनी धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. पिवळ्या टोप्या, पिवळे झेंडे घेऊन आंदोलनकर्ते सहभागी झाले. ' एसटी आरक्षण... ' असा आशय टोप्यांवर होता. ' धनगर हित की बात करेगा, वही महाराष्ट्र में राज करेगा', या आशयाच्या फलकांचाही समावेश होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDhangar Reservationधनगर आरक्षणGopichand Padalkarगोपीचंद पडळकर