शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पालकमंत्र्यांना दाखवणार होते काळे झेंडे; इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समिती पदाधिकाऱ्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 11:38 IST

इचलकरंजी : शहरासाठी मंजूर असलेली सुळकुड पाणी योजना ताबडतोब राबवावी या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करत आहे. ...

इचलकरंजी : शहरासाठी मंजूर असलेली सुळकुड पाणी योजना ताबडतोब राबवावी या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करत आहे. या संतापातून सुळकुड पाणी योजना कृती समितीच्यावतीने गुरुवारी इचलकरंजी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात येणार होती. दरम्यान, आंदोलनाच्या पूर्वीच राष्ट्रवादीचे मदन कारंडे आणि लालबावट्याचे सदा मलाबादे या दोघांना पोलिसांनी अटक केली. तसेच आंदोलनासाठी राजाराम स्टेडियम परिसरात जमलेल्या आंदोलकांना पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी रक्तपाथाची भाषा करणाऱ्या हसन मुश्रीफ यांचा धिकार असो, पाणी आमच्या हक्काचं, कोण म्हणते देत नाही, चले जाओ चले जाओ पालकमंत्री चले जाओ. अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. अटक करताना आंदोलक व पोलिसात किरकोळ झटापट झाली. दोन पोलीस व्हॅन मधून सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अटक केलेल्यांमध्ये काँग्रेसचे राहुल खंजिरे, स्वाभिमानीचे विकास चौगुले, नागरिक मंचेचे अभिजीत पटवा, शिवसेनेचे सयाजी चव्हाण आधीच विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांचा समावेश आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीHasan Mushrifहसन मुश्रीफPoliceपोलिस