शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर उत्तरमधील भाजपचा विजय सोपा, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 13:27 IST

कोल्हापूर : काँग्रेस सरकारच्या काळात जैन, साधू आणि मुनींवर हल्ले झाले आहेत. जातीपातीत आणि समाजात संघर्ष निर्माण करायचा आणि ...

कोल्हापूर : काँग्रेस सरकारच्या काळात जैन, साधू आणि मुनींवर हल्ले झाले आहेत. जातीपातीत आणि समाजात संघर्ष निर्माण करायचा आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची, ही काँग्रेसची आजवरची नीती आहे. सध्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत, विरोधकांनी दहशत आणि दबावाचे राजकारण सुरू केले आहे. यामुळे उत्तरमधील भाजपचा विजय सोपा झाला आहे, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.शुभंकरोती हॉलमध्ये रविवारी चाय पे चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपचे उमेदवार सत्यजित नाना कदम यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांनी थेट मंगळवार पेठ, बेलबाग परिसरातील जैन बांधवांशी संवाद साधला. सत्यजित कदम यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. विरोधकांकडून सत्तेचा आणि पदाचा कितीही गैरवापर केला, तरी कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या करवीरनगरीची कुस्तीपंढरी म्हणून ओळख आहे. येथे तालमी चालतील, पण दहशत चालणार नाही. कोल्हापूरची जनता दहशत झुगारून देत, सत्यजित कदम यांनाच विजयी करतील.ललित गांधी म्हणाले, समाजाच्या जडणघडणीत जैन समाजाचा मोठा वाटा आहे. जैन समाजाने स्वतःच्या हिमतीवर एकी आणि प्रगती साधली आहे. त्यामुळे भाजपच्या विकासाची ध्येयधोरणे या समाजाला पटली आहेत. त्यामुळे भाजपच्या पाठीशी जैन समाजाचे पाठबळ आहे.या वेळी माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, उमेदवार सत्यजित कदम, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांचीही भाषणे झाली. कदम यांच्या प्रचारासाठी पुण्याहून भाजप जैन समाज प्रतिष्ठानच्या महिला सदस्या कोल्हापुरात आल्या आहेत. या प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री मोदी, तृप्ती चोभारकर यांनी नियोजन केले. कार्यक्रमाला भरत गांधी, हितेश ओसवाल, किरण नकाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस