शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
3
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
4
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
5
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
6
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
7
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
8
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
9
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
10
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
11
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
12
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
13
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
14
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
15
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
16
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
17
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
18
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
19
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
20
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक

सत्तेतील भाजपचे कार्यालय पडते अपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 11:20 IST

राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपचा पसारा वाढला, ताकद वाढली. मात्र त्या मानाने सध्याचे त्यांचे बिंदू चौक सबजेलजवळील कार्यालय मात्र अपुरे पडत आहे. नित्यनेमाने होणारी वाहतुकीची कोंडी ही इथली प्रमुख अडचण असल्याने नियोजित भाजपचे पाच मजली सुसज्ज कार्यालय कधी होणार, याची आता कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. सुरुवातीपासूनच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपची फारशी ताकद नव्हती, ही वस्तुस्थिती आहे.

ठळक मुद्देसत्तेतील भाजपचे कार्यालय पडते अपुरेवाहतुकीची नेहमी कोंडी, सुसज्ज इमारतीची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपचा पसारा वाढला, ताकद वाढली. मात्र त्या मानाने सध्याचे त्यांचे बिंदू चौक सबजेलजवळील कार्यालय मात्र अपुरे पडत आहे. नित्यनेमाने होणारी वाहतुकीची कोंडी ही इथली प्रमुख अडचण असल्याने नियोजित भाजपचे पाच मजली सुसज्ज कार्यालय कधी होणार, याची आता कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.सुरुवातीपासूनच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपची फारशी ताकद नव्हती, ही वस्तुस्थिती आहे.

कोल्हापूर शहर, आजरा आणि मलकापूर परिसरांत अधूनमधून भाजपची मंडळी कुठल्या तरी सत्तेत असलेली दिसायची. आजऱ्यात उपसभापतिपदापर्यंत आणि जिल्हा परिषदेत के. एस. चौगुले यांच्या रूपाने बांधकाम समिती सभापतिपदापर्यंत भाजपने झेप घेतली. युतीचे शासन आल्यानंतर भाजपसाठी कार्यालय घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.बिंदू चौकातील सबजेलजवळ प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांचा वाडा होता. तो पाडून व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या पहिल्या मजल्यावरील एक सदनिका भाजप कार्यालयासाठी घेण्याचे निश्चित झाले. ५ एप्रिल २००० रोजी माजी दुग्धविकास राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते आणि महापौर बाबू फरास, दादासाहेब सांगलीकर, कर्नल शंकरराव निकम, विनित कुबेर, सुभाष वोरा यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी बाबा देसाई हे जिल्हाध्यक्ष होते, तर बापूसाहेब मासाळ जिल्हा सरचिटणीस होते.या ठिकाणी असणाऱ्या छोट्या सभागृहामध्ये सध्या शहर आणि जिल्ह्याच्या अनेक बैठका होतात. ७५ ते ८० जण बसतील एवढी जागा या ठिकाणी आहे; परंतु त्यापेक्षा अधिक संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले की मग मात्र येथे अडचण होते आणि अनेकांना गॅलरीमध्ये उभे राहावे लागते. या ठिकाणी पक्षाचे छोटे कार्यालयही आहे.सगळ्यांत मोठी अडचण म्हणजे हा रस्ता रहदारीचा आहे. भवानी मंडपाकडून बिंदू चौकाकडे जाणारी एकेरी वाहतूक येथून होत असल्याने इथे नेहमी वाहनांची वर्दळ असते. अशातच सत्तेतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या चार, पाच चारचाकी गाड्या येऊन लागल्या की येथे वाहतुकीची कोंडी ठरलेली. त्यामुळे भाजपच्या पत्रकार परिषदेला गेलेल्या पत्रकारांनाही आपल्या गाड्या कुठे लावायचा, हा अनेकदा प्रश्न पडतो.

परंतु जिल्हा कार्यालयाचे महत्त्व ओळखून पक्षाने सत्ता नसतानादेखील कुणाच्या तरी घरामध्ये कार्यालय सुरू करण्यापेक्षा पक्षाचे स्वतंत्र कार्यालय खरेदी करण्याचा त्यावेळी घेतलेला निर्णय दूरदृष्टीचा होता यात शंका नाही. भाजपच्या अनेक नेत्यांनी या कार्यालयामध्ये उपस्थिती दर्शवली आहे.आता भाजपने नवीन सुसज्ज असे कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. खानविलकर पेट्रोल पंपासमोर ही जागा आहे. या ठिकाणी पाच मजल्यांचे कार्यालय, एका मजल्यावर नेत्ररुग्णालय असे नियोजन असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे आता भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नव्या कार्यालयाच्या प्रतीक्षेत आहेत. 

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर