कागल विधानसभा मतदारसंघात भाजपची मुसंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST2021-01-22T04:22:11+5:302021-01-22T04:22:11+5:30
: ३०ठिकाणी सत्तेत. १३७ सदस्य. कागल : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघात १३७ तर कागल तालुक्यात भाजपने १०३ जागा ...

कागल विधानसभा मतदारसंघात भाजपची मुसंडी
: ३०ठिकाणी सत्तेत. १३७ सदस्य.
कागल : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघात १३७ तर कागल तालुक्यात भाजपने १०३ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे. कागल तालुक्यात २४ ठिकाणी तर कडगाव, कौलगे, उत्तूर मतदारसंघांत ६ अशा एकूण ३० ठिकाणी भाजप सत्तेत राहणार आहे, अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कागल तालुक्यात ५३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. भाजपने या निवडणुकीत २६५ उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये १०३ सदस्य निवडून आले असून कडगाव-कौलगे, उतूर जि. प. मधील गावांतून ३४ उमेदवार विजयी झाले आहेत.
विशेष म्हणजे या निवडणुकीत गतवेळच्या तुलनेत जिंकलेल्या सदस्यसंख्येत ३२ जागा वाढल्या आहेत. यावरून तळागाळापर्यंत भाजपकडे वाढता कल असल्याचे स्पष्ट होते. भाजपच्या दृष्टीने हे चांगले यश आहे. ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक बाबासाहेब पाटील, भाजपचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी घेतलेल्या कष्टाचेच हे फळ आहे.
चौकट
....हा तर अजबच प्रकार
आपल्या गटाला किती जागा मिळाल्या हे त्या गटाच्या प्रमुखाने सांगणे मी समजू शकतो. पण आम्हाला मिळालेल्या जागा कोणीतरी दुसरेच जाहीर करते. हेच त्यांचे अपयश असून हा तर अजब व त्यांचे दृष्टीने दुर्दैवी प्रकार आहे, अशी टीका घाटगे यांनी मंत्री मुश्रीफ यांचे नाव न घेता केली.
कृपया समरजित घाटगे यांचा सिंगल फोटो छापावा.