शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता राखण्यासाठी भाजपच्या हालचाली,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलावली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 10:54 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख नेत्यांची यासाठी बैठक बोलावली आहे. यामध्ये प्राथमिक रणनीती ठरविण्यात येईल.

ठळक मुद्देसत्ता राखण्यासाठी भाजपच्या हालचालीप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलावली बैठक

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख नेत्यांची यासाठी बैठक बोलावली आहे. यामध्ये प्राथमिक रणनीती ठरविण्यात येईल.जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. आमदार हसन मुश्रीफ , आमदार सतेज पाटील आणि आमदार पी. एन. पाटील या तिघांनीही जिल्हा परिषदेत सत्तांतर घडविण्याचा चंग बांधला आहे; यासाठी बहुतांशी सदस्यांची एक बैठकही त्यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा बँकेत घेतली.या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आज, शनिवारी ही बैठक बोलावली आहे.

आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक यांना या बैठकीसाठी निरोप देण्यात आले आहेत. भाजपने जनसुराज्य, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, ताराराणी आघाडी, युवक क्रांती आघाडी, ताराराणी विकास आघाडी, अपक्ष अशी गोळाबेरीज करून पावणेतीन वर्षांपूर्वी भाजपच्या शौमिका महाडिक यांना अध्यक्षपदी बसविले; मात्र आता राज्यातील सत्ता हातातून गेल्याने आणि जिल्ह्यातील बळ कमालीचे घटल्याने भाजप सध्या बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सतेज पाटील, पी. एन. पाटील आणि हसन मुश्रीफ या तिघांपैकी किमान दोघांचे मंत्रिपद निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखणे सोपी गोष्ट नाही; परंतु तेच नियोजन घालण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.स्थानिक समीकरणे वेगळीमहाआघाडी म्हणून राज्य पातळीवर शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या असतील, तरी त्याची तंतोतंत अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होत नसते. यावर भाजपची भिस्त असून, गेल्यावेळचे मित्रपक्ष आता नेमकी काय भूमिका घेणार, यावर जिल्हा परिषदेतील सत्तेचे गणित अवलंबून आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर