शेतीव्यवस्था उद्योगपतींच्या घशात घालण्याचे भाजपचे षङ्‌यंत्र- बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 06:29 PM2020-11-05T18:29:38+5:302020-11-05T18:31:13+5:30

congress, morcha, kolhapurnews सध्याची शेतीव्यवस्था मोडून बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचे भाजपचे षङ्‌यंत्र आहे, अशी टीका राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. सर्व व्यवस्था मोडून देशाला देशोधडीला लावणारे हे सरकार शेतकऱ्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

BJP's conspiracy to put agriculture in the throats of industrialists - Balasaheb Thorat | शेतीव्यवस्था उद्योगपतींच्या घशात घालण्याचे भाजपचे षङ्‌यंत्र- बाळासाहेब थोरात

शेतीव्यवस्था उद्योगपतींच्या घशात घालण्याचे भाजपचे षङ्‌यंत्र- बाळासाहेब थोरात

Next
ठळक मुद्दे शेतीव्यवस्था उद्योगपतींच्या घशात घालण्याचे भाजपचे षङ्‌यंत्र, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका नियमित कर्जदार व दोन लाखांवरील शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी

कोल्हापूर: सध्याची शेतीव्यवस्था मोडून बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचे भाजपचे षङ्‌यंत्र आहे, अशी टीका राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. सर्व व्यवस्था मोडून देशाला देशोधडीला लावणारे हे सरकार शेतकऱ्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभर सुरू असलेल्या आंदोलनातंर्गत महाराष्ट्रातील ट्रॅक्टर रॅलीची सुरुवात गुरुवारी कोल्हापुरातून झाली. रॅलीच्या सांगतेनंतर दसरा चौकातील जाहीर सभेत मंत्री थोरात यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कडाकडून टीका केली.

शाहूंच्या भूमीत जे घडते, त्याचे पडसाद राज्यभर नव्हे तर देशभर उमटतात, म्हणूनच कोल्हापुरातून रॅलीची सुरुवात केली आहे, असे सांगून येथे मिळालेला प्रतिसाद पाहून निर्णय योग्य होता हे कळाले. असे मंत्री थोरात म्हणाले. आता राज्यभर शेतकऱ्यांना जागरूक केले जाणार आहे. आम्ही राज्यात चांगल्या पध्दतीने काम करत आहोत, पण केंद्र सरकार कायमच जनताविरोधी भूमिका घेत असल्याने अनेक अडचणी येत असल्याचे सांगून थोरात यांनी कोरोनामुळे आर्थिक अडचणी असताना देखील अतिवृष्टीग्रस्तांना १० हजार कोटी दिले. कर्जमाफी दिली. नियमित कर्जफेड करणारे व दोन लाखावरील शेतकरी यांनादेखील कर्जमाफीचा लाभ लवकरच दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

Web Title: BJP's conspiracy to put agriculture in the throats of industrialists - Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.