शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला किंमत मोजावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क साके : शेतकरी हा देशाचा मुख्य कणा आहे. भाजपने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले असून, ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

साके : शेतकरी हा देशाचा मुख्य कणा आहे. भाजपने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले असून, ही गंभीर बाब आहे. त्यांनी सहानुभूती दाखवून शेतकऱ्यांशी चर्चा करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची वज्रमुठ येत्या काळात भाजपला सत्तेतून घालवल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन मोडणाऱ्यांना शेतकरी आक्रोशाची किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. बाचणी ते वडशिवाले दरम्यान असणाऱ्या दूधगंगा नदीवरील नवीन पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील होते.

बाचणी दूधगंगा नदीवरील नवीन पुलाचे भूमिपूजन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, उपसभापती अंजना राजेंद्र सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील यांचा यावेळी धरण सोसायटी, ग्रामपंचायतीमार्फत सत्कार करण्यात आला.

येत्या दीड वर्षात या पुलाचे उद्घाटन करू, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. स्वागत सरपंच इकबाल नाईकवडी यांनी केले तर प्रास्ताविक एम. एस. पाटील यांनी केले. यावेळी सूर्यकांत पाटील, डी. एस्. सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला बाळासाहेब तुरंबे, उपसरपंच गणपती पाटील, विलास साठे, एस. एस. माने, गणपती फराकटे, एकनाथ पाटील, सुभाष भोसले, सागर पाटील, सुयोग वाडकर, संजय नाईक आदी उपस्थित होते.

चैाकट ः ऋतुराज पाटलांना सहकार्य...

कागल आणि करवीर तालुक्यांना जोडणारा हा पूल असून, याच्या उभारणीबाबत मंत्री मुश्रीफ यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे. बाचणीची जिलेबी सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याचा धागा पकडत कागल आणि करवीरचे संबंध यापुढेही असेच गोड ठेवूया तसेच आगामी जिल्हा बॅंक, राजाराम कारखाना, गोकुळसह सर्वच निवडणुकीत विजय मिळवून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देऊया, असा निर्धार आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.

फोटो ओळी ः बाचणी (ता. कागल) येथील नवीन पुलाचे भूमिपूजन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनोज फराकटे, सूर्यकांत पाटील आदी उपस्थित होते.