शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून कोल्हापूर लोकसभेच्या दोन्हीही जागेवर लक्ष - केंद्रीय विधि व न्यायमंत्री बघेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 15:57 IST

भाजपाकडून लोकसभा निवडणुकीची दीड वर्षे अगोदरच तयारी सुरू

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप दीड वर्षांचा कालावधी असला तरीही भाजपकडून देशातील १४४ मतदार संघांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्हीही जागांचा समावेश असल्याचे मत केंद्रीय विधि व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंह बघेल यांनी व्यक्त केले.भाजपाकडूनलोकसभा निवडणुकीची दीड वर्षे अगोदरच तयारी सुरू केली आहे. लोकसभा प्रवास योजनेंतंर्गत मंत्री बघेल हे तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्याकडे कोल्हापूरसह तीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्हीही खासदार हे भाजपचे असतील का? यावर मंत्री बघेल म्हणाले, राजकारणात कोणत्याही शक्यतेचा इन्कार नाकारता येत नाहीत. युती कोणासोबत करायची हे वेळ आल्यावरच ठरविले जाते. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, संघटना मजबूत करण्याचे आमचे काम आहे. मित्र कोण आणि शत्रू कोण हे वरिष्ठच ठरवतील, असेही ते म्हणाले.

शिवसेना बंडखोर मतदार संघावर भाजपचे लक्ष

भाजपकडून लोकसभेच्या ज्या मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे, त्यात राज्यातील सर्वाधिक मतदार संघ बंडखोर शिवसेना खासदारांचे आहेत पण याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच शिंदे गट आणि भाजप एकत्रित लढणार असल्याचे सांगितले आहे, त्यानुसार पुढील रणनीती ठरविली जाईल, असेही मंत्री बघेल यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक