शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Jayant Patil: पृथ्वीवर मानव जन्माला यायच्या आधीच 'भाजप'ची स्थापना, जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 10:56 IST

५० वर्षात तीन वेळा पक्षाची नावे बदलणाऱ्यांकडून यापेक्षा दुसरा कोणता विनोद घडूच शकत नाही, त्यांच्या या बोलण्याला आमचा पाठिंबाच असेल असा चिमटाही काढला.

कोल्हापूर : भाजप हा इतका जुना पक्ष आहे की पृथ्वीतलावर मानव जन्माला यायच्या आधीच त्याची स्थापना झाली होती असे जरी म्हटले तरी आम्हाला काही हरकत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली. ५० वर्षात तीन वेळा पक्षाची नावे बदलणाऱ्यांकडून यापेक्षा दुसरा कोणता विनोद घडूच शकत नाही, त्यांच्या या बोलण्याला आमचा पाठिंबाच असेल असा चिमटाही काढला.

राष्ट्रवादी परिवार संवादयात्रेच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेल्या जयंत पाटील यांच्याशी गुरुवारी संध्याकाळी पत्रकारांनी संवाद साधला. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी भाजपला पाच हजार वर्षांपूर्वीची परंपरा असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर विचारणा केली असता त्यांनी मिश्कील टिप्पणी केली. ते म्हणाले, भाजपचा जन्म होऊन ५० वर्षेदेखील झालेली नाहीत.

या काळात त्यांच्या पक्षाने तीन वेळा नावे बदलली, तीन स्थित्यंतरे पक्षाने पाहिली आहेत. काँग्रेसचे मात्र नाव कधीच बदलले नाही. ज्यांना स्वत:चाच इतिहास माहीत नाही त्यांनी १० हजार वर्षांपूर्वी असे म्हटले तरी काही फरक पडत नाही. लोकांचे मात्र चांगले मनोरंजन होते, त्यामुळे अशी वक्तव्ये करत राहा, आमचा कायमच पाठिंबा राहील.

दादांना विश्रांतीची गरजचंद्रकांत पाटील हे काहीही बाेलत राहतात, त्यांचे बोलणे आता किती गांभिर्याने घ्यायचे हेच बघावे लागणार आहे. त्यांना आता थोडी विश्रांती घ्यावी, कोल्हापूरकरांनी उत्तरच्या निवडणुकीत त्यांना हेच सांगितले आहे, आता ते किती मनावर घेतात, ते बघुया अशीही टीपणी पाटील यांनी केली.

ब्राह्मण समाजाची दिलगिरीआमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीतील सभेत केलेले वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे, पक्षाचे नाही. त्यांचे हे वाक्य मलाही अनपेक्षितच असल्यानेच मी भाषण थांबवण्याची सूचना केली, ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा आमचा हेतू पूर्वीही नव्हता, कधी असणार नाही, झाले ते चुकीचे होते, मी पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो, समाजाने गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJayant Patilजयंत पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा