शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

आई सरस्वती गेली..मायेचा आधार गेला, कायम उणीव भासणार; चंद्रकांतदादांनी व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 18:45 IST

ती इथे घरात होती त्यामुळे मी निर्धास्त होतो. निश्चिंत होताे. मात्र आता मात्र तिची कायम उणीव भासत राहील.

माझी आई निपाणीची. जमादार यांच्या घरातील. निरक्षर. सहीदेखील करता येत नव्हती. परंतु तिचे व्यवहारज्ञान चोख होते. माझी सावत्र आईही होती. तीदेखील वडिलांसोबत मिलमध्ये काम करत असे. आम्ही सर्वजण एकत्र राहत होतो. पण कधीही आईने तक्रार केली नाही. पूर्वी मुंबईत कोणीही गावाकडचा नातेवाईक शिकण्यासाठी, नोकरीसाठी येणार असेल तर तो तिथल्या आपल्या पाहुण्यांकडे राहत असे. हीच परंपरा आमच्या घरी होती. त्यामुळे मावसभाऊ, भाचा असे अनेकजण घरी रहायलाही होते. अभाविपचे काम सुरू केल्यानंतर तर घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या खूपच वाढली. परंतु कधीही आईने याबद्दल तक्रार केली नाही. कटकट केली नाही. श्रावण महिन्याआधी तर विनोद तावडे यांच्यापासून ते आशिष शेलार यांच्यापर्यंत अनेकजण घरी हक्काने यायचेच.कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये ती अस्वस्थ व्हायची नाही. शांत रहायची. मला तिच्या या गुणाचे खूप अप्रूप वाटायचे. तोच गुण अंगी बाणवण्याचा मी प्रयत्न करत आहे. मी अभाविपचे काम करण्याचा निर्णय घेतला. त्याला वडिलांचा मोठा विरोध होता. परंतु माझी आई आणि सावत्र आईने त्यांची समजूत काढली. मी वेळेत लग्न करावं, संसार करावा असा लकडा आईने माझ्या मागे लावला. मी लहानपणापासून ज्ञानेश्वरी वाचणारा. त्यामुळे संन्यस्त वृत्तीने काम करावे अशी माझी भूमिका होती. परंतु एक-दोन वर्षांसाठी संघटनेच्या कामासाठी गेलेला मी १३ वर्षांनी परत आलो. लग्न केलं. सहा वर्षांतच पहिली पत्नी गेली. मग चार वर्षांनी दुसरं लग्न केलं. पण या सगळ्यांमध्ये आमचे लग्न, संसार, मुलंबाळं याबाबत तिच्या मनासारख्या काही गोष्टी घडल्या नाहीत. पण या माउलीने त्याबद्दल कधीही खंत व्यक्त केली नाही.लहानपणी सुटीमध्ये माहेरी निपाणीला आम्ही गेलं पाहिजे हा मात्र तिचा आग्रह कायम असे. त्यानुसार मी निपाणीमध्ये खूपवेळा राहिलो आहे. दत्ता सामंत यांच्या संपानंतर मिल बंद पडल्या. मग आईबाबांनी सांगितलं, तू आम्हाला गावाकडं घर बांधून दे. मग भुदरगड तालुक्यातील खानापूर या गावी मी घर बांधलं. हे दोघेही तिथं राहू लागले. मी १९९५ ला लग्न केलं आणि कोल्हापूरमध्ये वाय. पी. पोवारनगरमध्ये भाड्याच्या घरात राहू लागले. तेव्हा दोघेही माझ्याकडे राहू लागले.संभाजीनगरमध्ये १९९९ साली मी घर बांधलं. तेव्हापासून आई माझ्यासोबतच होती. राजकारणामुळं माझा आणि ऑडिटच्या कामामुळं बायकोचा खूप प्रवास सुरू असतो. त्यामुळे आईच घरी सर्व बघायची. कोणाचं येणं, जाणं. घरी आलेल्यांचं स्वागत करायला तीच पुढे असायची. मुलासारखी असलेली घरी अनेक मंडळी आहेत. पण घरातल्या कोणीतरी स्वागत केलेलं येणाऱ्यांना आवडतं. ते काम आई आवडीने करायची. दहा वर्षांपूर्वी ती घरात पडली. वॉकर घेऊन चालत होती. पण तिने कोणाच्या आगतस्वागतात कमी नाही केले. ती इथे घरात होती त्यामुळे मी निर्धास्त होतो. निश्चिंत होताे. मात्र आता मात्र तिची कायम उणीव भासत राहील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील