पन्हाळ्यातून भाजपच्या रॅलीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:22 IST2018-06-19T00:22:08+5:302018-06-19T00:22:08+5:30
केंद्रातील भाजप सरकारने यशस्वी चार वर्षे पूर्ण केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने पन्हाळा येथून ‘संपर्क से समर्थन’ अभियानांतर्गत मोटारसायकल रॅलीला प्रारंभ केला.

पन्हाळ्यातून भाजपच्या रॅलीला प्रारंभ
पन्हाळा : केंद्रातील भाजप सरकारने यशस्वी चार वर्षे पूर्ण केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने पन्हाळा येथून ‘संपर्क से समर्थन’ अभियानांतर्गत मोटारसायकल रॅलीला प्रारंभ केला.
भा.ज.यु.मो.चे. जिल्हाध्यक्ष डॉ.अजय चौगले यांच्या हस्ते बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून अभियानाची सुरुवात करण्यात आली. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून बाजीप्रभू देशपांडे चौक, शिवाजी महाराज पुतळा, पुसाटी बुरुज, वीर शिवा काशीद समाधीस्थळ आदी परिसरातील कचरा, प्लास्टिक पिशव्या, काचेच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या.
बाळासाहेब भोसले, अमरसिंह भोसले, तालुका अध्यक्ष सचिन शिपुगडे, संग्राम घोरपडे, शहाजी कुदळे, विजय मोरे, अॅड. मिलिंद कुराडे, बबन चौगले, प्रकाश शेलार, संभाजी चौगले उपस्थित होते.
केंद्रातील भाजप सरकारने यशस्वी चार वर्षे पूर्ण केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने पन्हाळा येथून ‘संपर्क से समर्थन’ अभियानांतर्गत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.