भाजपतर्फे रिक्षा व्यावसायिकांना धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:22 IST2021-05-15T04:22:43+5:302021-05-15T04:22:43+5:30

कोल्हापूर भाजपच्यावतीने शुक्रवारी शहरातील रिक्षाचालकांना धान्य व संसारोपयोगी साहित्य वितरित करण्यात आले. ...

BJP provides foodgrains to rickshaw pullers | भाजपतर्फे रिक्षा व्यावसायिकांना धान्य

भाजपतर्फे रिक्षा व्यावसायिकांना धान्य

कोल्हापूर भाजपच्यावतीने शुक्रवारी शहरातील रिक्षाचालकांना धान्य व संसारोपयोगी साहित्य वितरित करण्यात आले. राजारामपुरी ११ व्या गल्लीत झालेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले.

यावेळी कॉमन मॅन व युवक मित्र मंडळतर्फे चालणाऱ्या जनसेवा केंद्रास पाटील यांनी सदिच्छा भेट दिली व केंद्राच्या उपक्रमाची माहिती घेतली.

याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदुलकर, ॲड. वंदुरे-पाटील, भाजपा रिक्षा आघाडी संयोजक नरेंद्र पाटील, अविनाश दिंडे, सुनीलसिंह चव्हाण, अभिजित शिंदे, दिलीप बोंद्रे, तानाजी निकम, सचिन साळोखे आदी कार्यकर्ते व रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.

१४०५२०२१ कोल चंद्रकांत पाटील ०१

कोल्हापूर येथील रिक्षाचालकांना भाजपच्यावतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते धान्य वितरण करण्यात आले. यावेळी विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकाेडे उपस्थित होते.

Web Title: BJP provides foodgrains to rickshaw pullers