पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:24 IST2021-05-06T04:24:29+5:302021-05-06T04:24:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असून तृणमूल काँग्रेसच्या ...

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असून तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांनी घाबरवण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याचा आरोप भाजपने बुधवारी केला. त्याच्या निषेधार्थ येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये स्वतः आमदार पाटील सहभागी झाले होते.
निवडणुका झालेल्या अन्य राजात कुठेही हिंसात्मक प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही परंतु पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे . येथे तृणमूल काँग्रेसने २०० जागा मिळवल्या. त्यांना २ कोटी ७६ लाख मते पडली. भाजपला ७८ जागांवर विजय मिळाला. भाजपला २ कोटी २७ लाख मते मिळाली. तृणमूल काँग्रेस व भाजपमध्ये केवळ ४० लाख मतांचा फरक आहे. तिथे भाजपचा विचार रुजवणारे हजारो कार्यकर्ते या निवडणुकीत राबत होते. त्या कार्यकर्त्यांनी यापुढे भाजपचे विचार येथे रुजवू नयेत. याकरिता त्यांना घाबरवण्यासाठी हा हिंसाचार सुरू आहे, असा आरोप आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, शंतनू मोहिते, अक्षय निरुखेकर, सिद्धार्थ तोरस्कर, कृष्णा अथवाडकर उपस्थित होते .
फोटो : ५०५२०२१- कोल- चंद्रकांत
फोटो ओळी : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात बुधवारी सकाळी भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात आली.(छाया : आदित्य वेल्हाळ)
( कोल डेस्क वर मेल केला आहे फोटो)