गडहिंग्लजमध्ये भाजपतर्फे आघाडी सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:29+5:302021-03-24T04:22:29+5:30
शहरातील दसरा चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारच्या निषेधाचे फलक हातात घेऊन निदर्शने केली. यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांना निवेदनही ...

गडहिंग्लजमध्ये भाजपतर्फे आघाडी सरकारचा निषेध
शहरातील दसरा चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारच्या निषेधाचे फलक हातात घेऊन निदर्शने केली. यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, वाझे प्रकरणातील गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कृत्य अशोभनीय आहे. जनतेचा विश्वासघात झाला आहे. त्यामुळे मंत्री देशमुखांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. या प्रकरणाची ‘ईडी’मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अन्यथा भाजपातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
आंदोलनात भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, पं. स. सदस्य विठ्ठल पाटील, जयश्री तेली, मारुती राक्षे, चंद्रकांत सावंत, संदीप नाथबुवा, अनिल खोत, प्रीतम कापसे, सुभाष चोथे, आशिष साखरे आदींनी सहभाग घेतला.
--------------------------
* फोटो ओळी :
गडहिंग्लज येथील दसरा चौकात भाजपातर्फे आघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी राजेंद्र तारळे, विठ्ठल पाटील, संदीप नाथबुवा, जयश्री तेली, प्रीतम कापसे आदी उपस्थित होते. (मज्जीद किल्लेदार)
क्रमांक : २३०२२०२१-गड-०१