कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपच सत्तेत : चंद्रकांतदादा पाटील

By Admin | Updated: March 13, 2017 12:28 IST2017-03-13T12:28:26+5:302017-03-13T12:28:26+5:30

भाजप, जनसुराज्य शक्ती आणि ताराराणी आघाडीच्या सदस्यांच्या सत्कार

BJP in power in Kolhapur Zilla Parishad: Chandrakant Dada Patil | कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपच सत्तेत : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपच सत्तेत : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपच सत्तेत : चंद्रकांतदादा पाटील
फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता येणार हे निर्विवाद सत्य आहे. त्यावर केवळ शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. रविवारी येथील एका हॉटेलवर भाजप, जनसुराज्य शक्ती आणि ताराराणी आघाडीच्या सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सर्व सदस्यांना निवडणुकीच्या परिस्थितीबाबत माहिती देऊन कोणत्याही परिस्थितीत एकानेही वेगळी भूमिका घेता कामा नये असा कडक इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच आता सत्कारावेळी दिलेले फूल हे प्रतिकात्मक असून ते म्हणजे माझ्याकडून दिला जाणारा निधीच आहे असे समजा असेही मंत्र्यांनी सांगितले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, जयसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे, संघटन मंत्री बाबा देसाई, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडिक व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BJP in power in Kolhapur Zilla Parishad: Chandrakant Dada Patil