शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बहुमताच्या जोरावर आम्ही काही करू शकतो अशा पद्धतीचे भाजपचे नियोजन - सतेज पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 16:25 IST

'..त्यामुळे मंत्री कोकाटेंवर कारवाई होणार नाही'

कोल्हापूर : केंद्र सरकारने महात्मा गांधी यांच्या नावाने असणाऱ्या मनरेगाचे नाव बदलल्याने कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्यावतीने पापाची तिकटी येथे केंद्र सरकारविरोधात निर्दशने करण्यात आली. काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात इंडिया आघाडीतील कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.आमदार सतेज पाटील म्हणाले, मनरेगा योजनेच्या माध्यमातून महात्मा गांधी यांची चिरंतन आठवण देशभरातील गरिबांसाठी होती. तेच पुसण्याचे पाप भाजपने केले आहे. त्याचा निषेध आहे. सभागृहात देखील विरोधी पक्षाच्या सर्व खासदारांनी हे बिल जॉईंट सिलेक्शन कमिटीकडे पाठवा अशा पद्धतीची मागणी केली आहे. पण बहुमताच्या जोरावर या देशात आम्ही काही करू शकतो अशा पद्धतीचे नियोजन भाजपचे सुरू आहे. प्रज्ञा सातव तडकाफडकी निर्णय घेतील अस वाटत नाहीहिंगोली येथील काँग्रेसच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, मला सकाळी अनेक लोकांचे फोन आले, मी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे. त्यामुळे मला वाटत नाही त्या पक्ष सोडतील. अगदी कठीण परिस्थितीमध्ये त्यांना आमदारकी देण्याबाबतची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली होती. त्यामुळे मला वाटत नाही अशा प्रकारे तडकाफडकी निर्णय घेतील. महापालिकेत आघाडीबाबत 'वंचित'चा प्रस्ताव नाहीमहापालिका निवडणुकीत आघाडीबाबत राज्यपातळीवर काही चर्चा सुरू आहेत, स्थानिक पातळीवर काही लोकांच्या अड्जस्टमेंट झाल्या आहेत. कोल्हापूरमध्ये वंचितचा आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही. ..त्यामुळे कोकाटेंवर कारवाई होणार नाहीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहेत. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, काहीही होणार नाही, केंद्र सरकार, राज्य सरकार पाठीशी आहे. त्यामुळे शिरसाट असू देत किंवा कोकाटे यांच्यावर कारवाई होणार नाही. हे सरकार हे संवेदनशील आहे असे वाटत नाही. कोणावर कारवाई होतील अशी अपेक्षा जनतेने सोडून दिली असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. मुंबईचा विषय वेगळा मुंबई महानगरपालिकेत आघाडीबाबत बोलताना पाटील म्हणाले, मुंबईचा अन् महाराष्ट्राचा विषय वेगळा आहे. मुंबईमध्ये स्थानिक लोकांची मतमतांतरे वेगवेगळी आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची भूमिका स्वतंत्र जाण्याची भूमिका आहे. पण महाराष्ट्रात आम्ही अनेक ठिकाणी एकत्र आहोत. पुण्यात एकत्र आहोत सांगलीत एकत्र आहोत अनेक राज्यातल्या महत्त्वाच्या शहरात एकत्र असल्याचे सांगितले.