शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खासदार बदला.. कोल्हापूर बदलेल, हाच जनतेचा हट्ट - सतेज पाटील 

By विश्वास पाटील | Updated: April 10, 2024 14:21 IST

'अजिंक्यतारा कार्यालयाचा २०१९ च्या निवडणुकीत रोल काय होता हे मंडलिक यांनी अनुभवले आहे'

कोल्हापूर : खासदार बदला. कोल्हापूर बदलेल हाच कोल्हापूरच्या जनतेचा हट्ट आहे. त्यामुळे शाहू छत्रपती यांच्या निमित्ताने कोल्हापूरची अस्मिता संसदेत पोहोचेल असे प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिले. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील पक्ष फोडाफोडाचे पेटंट भाजपकडे असल्याची टीकाही त्यांनी केली.शिंदेसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटन समारंभात मंगळवारी भाजप नेते व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांना फोडाफोडीचे राजकारण करून आपला डाव साधायचा आहे असे ते म्हणाले होते. त्याला आमदार पाटील यांनी उत्तर दिले. सतेज पाटील म्हणाले, फोडाफोडीचा जो काही पॅटर्न, पेटंट आहे तो सगळा भाजपकडे आहे. तो आम्हाला लागू होवू शकत नाही. ज्यांनी पाच वर्षात कांहीच केले नाही ते काँग्रेसच्या तालुक्यात कार्यालय काढण्याच्या निर्णयावर टीका करत आहेत. जे लोक आज आमच्या अजिंक्यतारा कार्यालयावर टीका करत आहेत, त्याच कार्यालयाचा २०१९ च्या निवडणुकीत रोल काय होता हे मंडलिक यांनी अनुभवले आहे.राज ठाकरे यांचे असे कशामुळे परिवर्तन झाले की त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला अशी टिप्पण्णी त्यांनी केली. आमदार पाटील म्हणाले, महाराष्ट्रात भाजपकडून जे पक्षफोडाफोडीचे घाणरडे राजकारण झाले त्याविरोधात ठाकरे यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली होती. गेल्या लोकसभा निवडणूकीतील त्यांची भूमिकाही लोक अजून विसरलेले नाहीत. असे असताना त्यांनी घेतलेले भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांनाही मान्य होणारी नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kolhapur-pcकोल्हापूरbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटील