शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- भाजपचे नेते हवेत पाठी, कमळाला मात्र दिली सोडचिठ्ठी; समरजित घाटगे यांची नवी दिशा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 16:33 IST

विधानसभेच्या लढाईचे रणशिंग

कोल्हापूर : कागलविधानसभा मतदारसंघातून भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या आता सुरू असलेल्या प्रत्येक कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांना फलकावर स्थान आहे. परंतु, पक्षाच्या नावासह कमळ चिन्ह मात्र हद्दपार झाले आहे. मतदारसंघात कार्यकर्त्यांत त्याबाबत जोरदार चर्चा आहे.या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून समरजित हे गेल्या विधानसभेत पराभव झाल्यापासून रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत त्यांनी ९० हजारांवर मते मिळवून जोरदार हवा निर्माण केली. गेल्या विधानसभेला भाजप-शिवसेनेच्या वाटणीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्या पक्षाकडून संजय घाटगे यांनी ही निवडणूक लढवली. परंतु, ते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. कारण त्यांना तालुक्यातील शिवसेनेतूनच फारशी मदत झाली नाही. त्यामुळे मुख्य लढत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ व समरजित यांच्यातच झाली. पहिल्यांदा लढत देऊनही समरजित यांनी मुश्रीफ यांना जोरदार टक्कर दिली. पराभव झाल्यावर लगेचच ते पुढच्या विधानसभेच्या तयारीला लागले. त्यांचा प्रत्येक कार्यक्रम २०२४ ची विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच होत असताना मध्यंतरी राज्याच्या राजकारणात राजकीय फेरपालट झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाल्याने त्यांच्यासोबत मुश्रीफ हे गेल्याने त्यांना वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्रिपद मिळाले. आता मूळ भाजप, शिवसेना-शिंदे गट व राष्ट्रवादी-अजित पवार गट मिळून लोकसभा-विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय या तिन्ही पक्षांच्या महायुतीने घेतला आहे. त्यामुळे कागलची महायुतीची उमेदवारी विद्यमान आमदार व मंत्री म्हणून मुश्रीफ यांनाच मिळणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे समरजित यांना विधानसभेला भाजप व कमळ चिन्हाचा वापर करता येणार नाही. त्यावेळी अपक्ष म्हणून जे चिन्ह मिळेल ते घेऊन त्यांना लढावे लागेल. त्याची तयारी म्हणूनच त्यांनी आतापासूनच आपल्या फलकावरील कमळ दूर केले आहे. पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे पाठबळ त्यांना असल्याने त्यांच्यासह अन्य नेत्यांचे फोटो मात्र ते जरूर वापरत आहेत.

तयारीसाठी दीड वर्ष..गेल्या निवडणुकीत ऐनवेळी अपक्ष लढावे लागल्याने लोकांपर्यंत पोहोचण्यास मर्यादा आल्या. आता अपक्ष लढावे लागणार हे वर्ष-दीड वर्ष अगोदरच समजल्याने त्यादृष्टीनेच त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. एका बाजूला भाजपच्या सत्तेचा वापर करून मतदारसंघातील विकासकामांचा धडाका सुरू आहे. शासन आपल्या दारी उपक्रमात मंत्री मुश्रीफ यांना सहभागी करून घ्यावे लागते म्हणून त्यांनी या कार्यक्रमाचे नाव बदलून समरजित आपल्या दारी असे केले. राजे फाउंडेशन, शाहू समूह, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून ते सगळे कार्यक्रम घेऊ लागले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपाSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे