शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

“…निकालानंतर तोंडाला पाणी सुटलं आणि शरद पवारांच्या आश्रयात गेले;” अमित शाहंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 21:26 IST

आज वेळ बदलली आहे आणि खरी शिवसेना धनुष्यबाणासह भाजपसह आहे, असं अमित शाह म्हणाले.

कोल्हापूर:  येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व लोकसभेच्या ४८ जागा भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या निवडून द्या आणि महाराष्ट्रात भाजप शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करा, असं स्पष्ट आवाहन केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शाह यांनी केलं. दरम्यान, यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. “निवडणुकाचे निकाल आले आणि नंतर त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. सर्व तत्त्वांना त्यांनी बाजूला ठेवले आणि शरद पवारांच्या आश्रयात जाऊन मला मुख्यमंत्री बनवा म्हणाले,” असं म्हणत शाह यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

“आपल्याला निवडणुकांमध्ये जिंकायचं आहे. आता सर्व समस्या दूर झाल्या आहेत. २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढलो होतो. त्यावेळी मोदींचा मोठा फोटो लावला होता आणि लहान फोटो उद्धव ठाकरेंचा लावला होता की नाही? जेव्हा निवडणुकांचे निकाल आले तेव्हा तोंडाला पाणी सुटलं. सर्व तत्त्वांना बाजूला ठेवून शरद पवारांच्या आश्रयात गेले. त्यांना सांगितलं मला मुख्यमंत्री बनवा. मोठा पक्ष कोणता होता? कोण मुख्यमंत्री बनायला हवं होतं? आम्हाला सत्तेचा लोभ नाही, सत्तेसाठी आम्ही आमची तत्त्व बाजूला ठेवली नाहीत,” असं अमित शाह म्हणाले.

आज वेळ बदलली आहे...“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आज शरद पवारांच्या चरणात बसला होता. पण आज वेळ बदलली आहे आणि खरी शिवसेना धनुष्यबाणासह भाजपसह आहे,” असं त्यांनी नमूद केलं. मी पुन्हा सांगतो आमच्या मनात सत्तेचा मोह नाही. महाराष्ट्राचं हित सर्वतोपरी आहे. आजही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं काम भाजपच्या आमदारांनी केलं. महाराष्ट्रात निवडणुका असताना आमची अपेक्षा महाराष्ट्रात बहुमताची नाही. आम्ही संतुष्ट नाही. यावेळी संपूर्ण विजय हवा आहे. ४८ पैकी ४८ जागा आम्हाला हव्या असल्याचंही शाह यांनी स्पष्ट केलं.

“शिवसेना भाजप युती पुन्हा एकदा हे सिद्ध करेल की कुटील बुद्धीनं राजकारणाला सत्तेला काही काळासाठी मिळवू शकता. पण मैदानात येण्याचा येण्याची वेळ येते तेव्हा साहस, शौर्य, परिणाम आवश्यक आहे. तो तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडे आहे,” असंही त्यांनी म्हटलं.

टॅग्स :Amit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी