शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंनी दिला राजीनामा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 15:22 IST

शिवाजी सावंत  गारगोटी: भाजपाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देसाईंच्या राजीनाम्याने राधानगरी विधानसभा मतदारसंघात ...

शिवाजी सावंत गारगोटी: भाजपाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देसाईंच्या राजीनाम्याने राधानगरी विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली. दोन्ही जिल्हाध्यक्षांनी एकदम राजीनामा देण्याची पहिलीच वेळ आहे. राष्ट्रवादीच्या तुतारीने कोल्हापूर जिल्ह्यात पक्षांतर करण्याचे जणू रणशिंग फुंकले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमुळे देसाई यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे चित्र स्पष्ट होते. त्यामुळे त्यांची घुसमट होणार होती. अपक्ष लढावे लागणार असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असावे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे) यापैकी कोणत्या पक्षात प्रवेश करणार याचा निर्णय घेणार आहेत. मात्र, आमदार सतेज पाटील यांच्याशी त्यांच्या घराण्याचे जूने संबंध, घराण्यातील दोन पिढ्यांचा काँग्रेस पक्षासोबत आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचा शब्द घेऊन ते भविष्यातील त्यांची राजकीय वाटचाल महाआघाडीच्या बाजुने रहाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.पाच वर्षांपूर्वी माजी महसूलमंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र सत्तेचा कोणताही लाभ त्यांना मिळाला नसल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये असंतोष पसरला होता. त्यामुळे भाजपा सोडण्यासाठी त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी दबाव वाढवला होता. त्यांचा या विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र गट असल्याने ते विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहेत.

आमदार सतेज पाटील यांच्या जोडणीच्या माध्यमातून मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे. मात्र, ए वाय पाटील हे लोकसभेच्या निवडणुकीत अगोदरच त्या ठिकाणी गेले असल्याने उमेदवारीसाठी अडचणी वाढणार आहेत. पण कार्यकर्ते आणि जिल्ह्याच्या नेत्यांशी चर्चा करून पक्ष प्रवेश करण्यावर ते ठाम आहेत. अत्यंत मनमिळावू आणि शांत स्वभावामुळे त्यांची राजकारणात वेगळी ओळख आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणBJPभाजपा