शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडे भ्रष्टाचाऱ्यांच्या वॉशिंग मशीनची गॅरंटी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 12:11 IST

'चहा तिसऱ्यांदा कडवला की विष बनते'

कोल्हापूर : महागाईने जनता प्रचंड त्रस्त असून भाजपविरोधात देशभरात मोठी लाट आहे; मात्र भाजपचे नेते मात्र खोटी गॅरंटी देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. यांच्याकडे विकासाची नव्हे तर भ्रष्टाचारी, गुंड यांना स्वच्छ करणाऱ्या वॉशिंग मशीनची गॅरंटी असल्याचा घणाघात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला. चहा तिसऱ्यांदा कडवला की त्याचे विष बनते या शब्दांत त्यांनी केंद्र सरकारची खिल्ली उडवली.सावंत म्हणाले, महागाईने लोकांचे जीवन असह्य झाल्याने जनतेमध्येच भाजपविरोधात नाराजी आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांनी धर्माच्या आधारावर निवडणूक नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. धार्मिक ध्रुवीकरण हे त्यांचे शेवटचे अस्त्र आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील लहान सहान चुकीच्या गोष्टी शोधणारे भाजपवाले आमच्या जाहीरनाम्याचे प्रचारक बनल्याचा टोला लगावत राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.विमानतळाचे श्रेय घेणाऱ्यांनी भूसंपादनासाठी काय केले ?कोल्हापुरात महायुतीचा एक राज्यसभेचा तर दोन लोकसभेचे खासदार आहेत. या तिघांनी जिल्ह्यात एक तरी मोठा उद्योग आणला का ?, शाहू मिल यांना माहीत तर आहे का ? असा सवाल करत या तिन्हीही लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यात एक रुपयाचाही निधी आणला नसल्याचा आरोप सावंत यांनी केला. विमानतळाचे श्रेय घेणाऱ्यांनी भूसंपादनासाठी काय केले असा सवालही त्यांनी केला.पवार, शिंदे नेस्तनाबूत होतीलएकनाथ शिंदे, अजित पवार यांचे उमेदवारही भाजपच ठरवत आहे. त्यांना हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या जागा दिल्या आहेत. निवडणूक झाली की दोन्ही नेते नेस्तनाबूत होतील असा दावाही सावंत यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSachin sawantसचिन सावंतBJPभाजपा