शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ..अन्यथा सोयीची भूमिका घेवून ताकद दाखवू, भाजप नेते डॉ. संजय पाटील यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 16:01 IST

कुरुंदवाड येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा

कुरुंदवाड : देशात, राज्यात भाजप मोठा पक्ष असतानाही जिल्ह्यातील सहकारात भाजपाला मोजले जात नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळेच कार्यकर्ते पदापासून वंचित आहेत. शिरोळ तालुक्यात भाजपा कार्यकर्त्यांची ताकद आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तालुक्यात भाजपचाच उमेदवार द्यावा अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा भाजप नेते व पंचायतराज समिती प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी केले.येथील संजय सांस्कृतिक सभागृहामध्ये शिरोळ तालुका भाजपा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात डॉ. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे होते. डॉ. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सहकारातील निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्याला संधी दिली जात नाही, अशी खंत व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पक्षाला किमान चार जागा मिळाव्यात. त्यातही शिरोळ विधानसभेसाठी पक्षाचाच उमेदवार असावा अन्यथा आम्ही सोयीची भूमिका घेवून आपली ताकद दाखविली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.माजी नगराध्यक्ष डांगे म्हणाले, निवडणुकीत उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र काम करणाऱ्या व्यक्तीलाच पक्ष बोलावून तिकीट देतो ही भाजपची पद्धत आहे. पक्षातील जुना नवा वाद असा न करता तालुक्यातील पक्ष वाढण्यासाठी प्रत्येकांनी प्रामाणिक प्रयत्न करावा आणि पक्षाने देतील ते उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन डांगे यांनी केले.मेळाव्यात भाजपचे कार्यकर्ते संजय माने यांना मयूर उद्योग समूहाच्या वतीने तीनचाकी मोटारसायकल डॉ. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी भाजपा युवा आघाडी प्रदेश सचिव ॲड. सुशांत पाटील, संजय माने, आदलिंग चौगुले आदींची भाषणे झाली. मेळाव्यास सुनिल पाटील, मुकुंद पुजारी, महावीर तकडे, पोपट पुजारी, सुमित पाटील, जयपाल माणगांवे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. अविनाश शंभूशेट्टी यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाshirol-acशिरोळBJPभाजपा