शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कचरा घोटाळ्यावरुन भाजप कार्यकर्त्यांचा अतिरिक्त आयुक्तांना घेराव; फौजफाट्यासह पोलीस बैठक कक्षात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 19:57 IST

संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना घेराव घातल्याने पालिकेतील वातावरण तंग

कोल्हापूर : कचरा घोटाळ्यात मनपा प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे आणि आंदोलनाला अधिकारी सामोरे न आल्यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना घेराव घालून घोषणाबाजी केली. यामुळे पालिकेतील वातावरण तंग झाले.शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर व दोन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.एक महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीने कचरा घोटाळा उघडकीस आणल्यानंतरही चौकशी समितीचा अहवाल सादर झाला नसल्यामुळे भाजपाने बुधवारी मनपावर धडक देऊन निदर्शने करण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे सकाळी महानगरपालिकेच्या दारात निदर्शनांना सुरुवात केली. ‘कचरा घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या विजय पाटलांना निलंबित करा,’ असे फलक हातात घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणांनी मनपा परिसर दणाणून सोडला.एक तास चाललेल्या आंदोलनानंतरही अधिकारी सामोरे न आल्यामुळे संतप्त झालेल्या जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी कार्यकर्त्यांना मनपात घुसण्याचे आवाहन केले. त्यानंतर कार्यकर्ते आयुक्तांच्या केबिनकडे गेले. परंतु काही वेळाने अतिरिक्त आयुक्त कार्यकर्त्यांसमोर आल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला.यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण फौजफाट्यासह बैठक कक्षात दाखल झाले. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर व दोन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, अजित ठाणेकर, हेमंत आराध्ये, गायत्री राऊत, चंद्रकांत घाटगे, दिलीप मेत्रानी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, विजय आगरवाल, किशोरी स्वामी, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, अजित सूर्यवंशी, सुलभा मुजुमदार उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाCorruptionभ्रष्टाचारPoliceपोलिस