शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Accident: भरधाव एस. टी. बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पत्नी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 16:25 IST

कळंबा ते गारगोटी रस्त्यावर पॉवरग्रीटनजीक घटनास्थळ परिसरात ओढ्यावर धोकादायक वळण आहे. गेल्या चार वर्षात या मार्गावर सुमारे १३ जण अपघातात बळी गेले, अनेकजण जखमी झाले.

कळंबा : भरधाव एस. टी. बस आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत दुचाकीस्वार पती जागीच ठार झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना कळंबा ते गारगोटी मार्गावर कात्यायणी घाट, कळंबा पॉवर ग्रीट, घोडके मळानजीक मंगळवारी सकाळी घडली. चंदर तुकाराम कांबळे (वय ४२, रा. नागाव, ता. करवीर) असे ठार झालेल्याचे नाव असून त्यांची पत्नी सारीका कांबळे या गंभीर जखमी झाल्या आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चंदर कांबळे व त्यांच्या पत्नी सारीका कांबळे हे दाम्पत्य आपल्या दुचाकीवरुन नागाव येथून कोल्हापूरला येत होते. त्याचवेळी कोल्हापूरहून नंदगावकडे जाणारी एस. टी. बस भरधाव वेगाने जात होती. ही बस राँग साईटला आल्याने समोरुन येणाऱ्या कांबळे दाम्पत्याच्या दुचाकीला त्यांची जोराची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील कांबळे दाम्पत्य रस्त्यावर जोरात आपटले. त्यामध्ये चंदर कांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या सारीका कांबळे यांना तत्काळ उपचारासाठी खासगी वाहनाने सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले.दरम्यान, दुर्घटनेत दुचाकी एस. टी. बसच्या पुढील चाकाखाली सापडल्याने तिचा चक्काचूर झाला. अपघातानंतर कोल्हापूर ते गारगोटी मार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. दुर्घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली असून, बसचालक संदीप गणपती पाटील (रा. चंद्रे, ता. राधानगरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार वर्षात १३ बळीकळंबा ते गारगोटी रस्त्यावर पॉवरग्रीटनजीक घटनास्थळ परिसरात ओढ्यावर धोकादायक वळण आहे. गेल्या चार वर्षात या मार्गावर सुमारे १३ जण अपघातात बळी गेले, अनेकजण जखमी झाले. या वळणावर ना गतिरोधक, ना पुरेशी प्रकाश व्यवस्था. या रस्त्यावर किमान डझनभर हॉटेल्स, मंगल कार्यालये, पाणलोट क्षेत्रातील बेकायदेशीर अवैध बांधकामे, रस्त्यावर वाहनांचे बेशिस्त पार्किंग आहे. चांगला रस्ता असल्याने या मार्गावरुन वाहने सुसाट वेगाने धावतात. त्यामुळे अपघाताची मालिकाच मार्गावर घडत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात