शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

Kolhapur: आजऱ्याजवळ बाईक रायडरची कारला भीषण धडक; हेल्मेट तुटले, स्पोर्ट्स बाईकचा चक्काचूर; तरुण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 13:00 IST

आजरा : आजरा आंबोली राष्ट्रीय महामार्गावर देवर्डे ते माद्याळ तिट्टादरम्यान झालेल्या मोटरसायकल व चार चाकीच्या अपघातात कोल्हापूर येथील बाईकर ...

आजरा : आजरा आंबोली राष्ट्रीय महामार्गावर देवर्डे ते माद्याळ तिट्टादरम्यान झालेल्या मोटरसायकल व चार चाकीच्या अपघातातकोल्हापूर येथील बाईकर सिद्धेश विलास रेडेकर (वय २३ रा. माळी काॅलनी, टाकाळा कोल्हापूर ) याचा मृत्यू झाला आहे. तो कोल्हापूरमध्ये आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होता. बारा लाखांच्या रायडर गाडीचा अपघातात चक्काचूर झाला आहे.सिद्धेश रेडेकर हा आपल्या चार मित्रांसमवेत आज सकाळी आंबोली येथे बाईक रायडिंगसाठी आला होता. त्याच्यासोबत फरहाद खान (रा.रुईकर कॉलनी) नितांत कोराणे (रा. रंकाळा अंबाई टॅंक ) अमेय रेडीज (रा. नागळा पार्क सर्व रा. कोल्हापूर ) आपल्या गाडीने आले होते. कोल्हापुरी येथून सकाळी ६ नंतर सर्वजण रायडिंगसाठी निघाले होते. आंबोलीत येऊन त्यांनी घाटातील विविध ठिकाणी फोटोसेशनही केले. सिद्धेश रेडेकर याला मोटरसायकल बायकिंग व फोटोग्राफीची आवड होती. सकाळी ११ नंतर ते कोल्हापूरकडे जाण्यास निघाले. सिद्धेश पुढे होता तर त्याच्या पुढे एक तर मागे दोन मित्र होते. ते परत जात असताना देवर्डे माद्याळदरम्यानच्या धोकादायक वळणावर कोल्हापूर येथून सावंतवाडीकडे जाणाऱ्या तवेरा गाडी व सिद्धेशच्या गाडीचा जोराची धडक झाली. अपघातात त्याच्या डोक्याचे हेल्मेट रस्त्याच्या कडेला तुटून पडले होते. त्याच्या हाताला, छातीला व डोकीला गंभीर दुखापत झाली होती.त्याला तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचार करून गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सिद्धेश रेडकर याचा मित्र नितांत कोराने यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिल्याने तवेरा गाडीचा चालक विजय अरविंद पाटील (रा. यादवनगर कोल्हापूर ) याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेल्मेटही तुटलेअपघातस्थळी रायडिंगसाठी घेतलेली सिद्धेशच्या बारा लाखांच्या गाडीचा चक्काचूर होऊन पडली होती. याच ठिकाणी रायडिंगसाठी वापरले जाणारे ७० हजारांचे हेल्मेट व कॅमेराही पडला होता.महिन्यात पाच जणांचा मृत्यूसुळेरानजवळील अपघातात गोव्याची महिला तर गव्याच्या हल्ल्यात हात्तीवडेचा अजित कांबळे, पाठोपाठ साळगाव तिट्ट्यावर सुतार व रजाक शेख यांचा मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला आहे. आज सिद्धेश रेडेकर यांच्यारुपाने महामार्गावरील अपघातात महिन्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू