शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

जातीयवाद मोठा दहशतवाद

By admin | Updated: November 7, 2014 00:10 IST

जयंत भालेराव : सेक्युलर मुव्हमेंटचा जाहीर मेळावा

कोल्हापूर : अतिरेक्यांपेक्षा सद्य:स्थितीत जातीयवादी दहशतवाद मोठा वाटत आहे; कारण अतिरेकी एका गोळीत समोरच्याला ठार करतो, तर जातीयवादी हे माणसाचे तुकडे-तुकडे करून त्याला निर्घृणपणे ठार मारतात. त्यामुळे हा आतंकवाद मोठा आहे, असे प्रतिपादन सेक्युलर मुव्हमेंटचे मुख्य संघटक जयंत भालेराव (नाशिक) यांनी आज, गुरुवारी येथे केले.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सेक्युलर मुव्हमेंट संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र जाहीर मेळावा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी मुख्य संघटक प्रा. गौतमीपुत्र कांबळे होते.जयंत भालेराव यांच्या भाषणाने मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी भालेराव म्हणाले, धार्मिक विषमतेविरुद्ध कोणी आवाज उठवील त्याला संपविणे ही व्यवस्था चुकीची आहे. जातीयवादी दहशतवादाने आपली निर्घृणता खैरलांजी, अहमदनगर जिल्ह्यांतील दलितांना ठार मारून दाखविली आहे. याविरुद्ध आक्रोश करून आपल्या भावना व्यक्त करण्याला राज्य सरकार हे नक्षलवादाचे समर्थन करण्याची भाषा बोलत आहेत; परंतु आम्ही बौद्ध धम्माचे लोक असून, अहिंसेच्या विचाराने आमची वाटचाल सुरू आहे.गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्माचा अन्वयार्थ लावणाऱ्या राजा ढाले यांचे विचार, डॉ. प्रकाश आंबेडकरांचे राजकारणातील व्हिजन व आजच्या तरुण पिढीचा विचार घेऊन ‘सेक्युलर मुव्हमेंट’चे काम सुरू आहे. ‘सर्वच धर्मांतील लोक गुलाम’ ही गुलामगिरी नष्ट करण्याचे काम ही संघटना करील. सध्या चळवळीबद्दलचा गैरसमज वाढत चालला आहे. चळवळींवर बोलणाऱ्यांची व पुस्तके लिहिणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. हे लोक प्रत्यक्ष सहभागी झाल्यास क्रांती जरा लवकर होईल. स्वागताध्यक्षा अवंती कवाळे यांचे भाषण झाले. अ‍ॅड. जी. लासुरे, प्रा. डॉ. भरत नाईक, कैलास काळे, संग्राम सावंत, प्रसेनजित बनसोडे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रिपब्लिकन गटांचीविकृती नेस्तनाबूत करूसर्व रिपब्लिकन संघटना हतबल झाल्या आहेत. ही पोकळी भरून काढण्यासाठी व गलितगात्र समाजाला प्रेरणा देण्यासाठी संघटनेचे काम मोलाचे राहील. संघटनेने रिपब्लिकनांना स्वीकारले आहे; परंतु त्यांच्या गटातटांची विकृती स्वीकारलेली नाही. ती आम्ही नेस्तनाबूत करू, असा इशारा भालेराव यांनी यावेळी दिला.निषेध मोर्चाअहमदनगर येथील दलित हत्याकांडासह अन्यत्र होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ सेक्युलर मुव्हमेंटतर्फे शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. बिंदू चौक येथून दुपारी दीडच्या सुमारास मोर्चाला सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी चौक, सीपीआर रुग्णालय चौकमार्गे तो शाहू स्मारक भवन येथे नेण्यात आला.बीजेपी हे ‘आरएसएस’चे व्याज‘आरएसएस’च्या मुद्दलाचे बीजेपी हे व्याज आहे. त्या व्याजावरच केंद्रातील व राज्यातील भाजपचे सरकार निवडून आले आहे. तसेच कुठल्याही मंदिराचे उद्घाटन कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे लोक करतात; परंतु त्यानंतर हे मंदिर म्हणजे भाजपचे कार्यालय तयार होते, असा टोला हाणत गौतमीपुत्र कांबळे यांनी ‘प्रार्थनास्थळातील पुजारी ते बाहेरील भिकारी हटवा’ ही संघटनेची भूमिका राहणार असल्याचे सांगितले.कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी आयोजित ‘सेक्युलर मुव्हमेंट’च्या जाहीर मेळाव्यात मुख्य संघटक जयंत भालेराव (नाशिक) बोलत होते. शेजारी प्रा. एस. यु. सरतापे, अ‍ॅड. जी. लासुरे, प्रसेनजित बनसोडे, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, डॉ. भरत नाईक, अवंती कवाळे, कैलास काळे, संग्राम सावंत उपस्थित होते.