बड्या राजकीय घराण्यातील युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न ?

By Admin | Updated: October 1, 2014 01:18 IST2014-10-01T01:13:35+5:302014-10-01T01:18:07+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील एका बड्या राजकीय घराण्यातील एका युवकाने विधानसभेची उमेदवारी न

Big political man's suicide attempt? | बड्या राजकीय घराण्यातील युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न ?

बड्या राजकीय घराण्यातील युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न ?

कोल्हापूर : जिल्ह्यातील एका बड्या राजकीय घराण्यातील एका युवकाने विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याच्या नैराश्यात्ूान आज, मंगळवारी सकाळी हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे. या युवकावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार झाल्याचे समजते. उपचारानंतर संबंधित युवकाला घरी सोडण्यात आले. प्र्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी युवकाच्या घरातील व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. तसेच याबाबत पोलिसांतही नोंद झाली नाही. दुपारनंतर सोशल मीडियावर यासंदर्भातील मेसेज फिरत होते. रात्री वृत्तपत्रांच्या कार्यालयांतही विचारणा होत होती. (प्रतिनिधी)

 

Web Title: Big political man's suicide attempt?