शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

kolhapur news: विशाळगडावर पोलिसांची मोठी कारवाई, अवैध धंद्यांवर टाकले छापे; शिवप्रेमींमधून समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 12:21 IST

वनविभागासह, महसूल,पुरातन, बांधकाम व आता पोलिस कारवाईमुळे अतिक्रमणधारकांची झोप उडाली

आंबा : दुपारची बाराची वेळ, आकस्मिक गडाच्या पायथ्याशी चार पोलिसांच्या गाड्या लागल्या नि कोणाला कळायच्या आत दुकाने, हाॅटेल, पानपट्टी यांची झडती सुरू झाली. चोरटी दारू, तंबाखू, सिगारेट, मावा, गुटखा, गांजा, प्लास्टिक यांची तपासणी मोहीम पोलिसांनी हाती घेतली. पायथ्याची दुकाने, गडावरील दर्गा व झेंडा चौक परिसरातील दुकानांची झाडाझडती घेत अवैध व्यवसायात गुंतलेल्यावर कारवाईचा बडगा लगावला. जिथे भाविक मुक्कामी होते तिथे खोल्यातून तपास करून मद्यपींना दंड केला.काहींना दोनशे रुपयांचा दंड करून त्यांना समज देऊन सोडण्यात आले. कारवाईतील व्यावसायिकांना पोलिस स्थानकात कारवाईच्या पूर्ततेसाठी बोलावले आहे. गडावर चोरटी दारूविक्री, हुक्का, गांजा पत्त्यांचा डाव, पार्टीचे फोटो दोन दिवसांपूर्वी पोलिसांपर्यंत पोहोचवून यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार आज शाहूवाडी व कोल्हापूर पोलिसांनी कारवाई केली. गडावर ही पहिलीच मोठी पोलिस कारवाई झाल्याने शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले.विशाळगड राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित असताना गेल्या दशकभरात गडावरील महसूल व पुरातन विभागाच्या जागेत अतिक्रमणे वाढली आहेत. येथील बेकायदेशीर अतिक्रमणे हटविण्याची प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत असतानाच गडावर चार दिवसांपूर्वी रोजा इमारतीच्या परिसरात कोंबडी कत्तलखाना उभारण्यात आला. याची तक्रार शिवभक्तांनी करताच तहसीलदार गुरू बिराजदार यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने अतिक्रमण रोखले. त्यानंतर तीन दिवसांत आज पोलिसांनी गडावरील दुकानांवर छापे टाकून अवैध धंद्यांना लगाम लावला.गजापूर वाणीपेठ येथे पोलिसांनी उभारलेल्या चेक नाक्यावर वाहने थांबवून तपासणी लक्ष केंद्रित केले. गाड्या तपासूनच भाविकांना गडावर सोडले जात होते. वनविभागासह, महसूल,पुरातन, बांधकाम व आता पोलिस कारवाईमुळे अतिक्रमणधारकांची झोप उडाली आहे. सत्तर हजारांचा गुटखा पकडलायेथील अकबर पठाण यांच्या पानटपरीच्या छाप्यात सत्तर हजाराच्या गुटखा पुड्या पकडल्या. बाहेरून येऊन येथे मोक्याच्या जागा बळकावून अतिक्रमणाबरोबर अवैध धंद्यातही वरकमाई करणारी व्यावसायिकता येथे रुजली आहे. दुपारी बारा ते सायंकाळी सातपर्यंत पोलिसांचे छापा सत्र येथे चालू राहीले. शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रसाद कोळसे, सचिन पांढरे, प्रियंका सरादे यांनी आजची कारवाई केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस