‘बिद्री’च्या मतदार यादीला ‘ब्रेक’
By Admin | Updated: January 29, 2015 00:53 IST2015-01-29T00:45:38+5:302015-01-29T00:53:56+5:30
निवडणूक आयुक्तांची हरकत : प्रकाश आबिटकर यांची तक्रार

‘बिद्री’च्या मतदार यादीला ‘ब्रेक’
कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कच्ची मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेस सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी यांनी हरकत घेतली आहे.
कारखाना प्रशासनाने ठराव जमा करण्याची मुदत सहा दिवस ठेवल्याने ती बेकायदेशीर असल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यासंबंधीची लेखी तक्रार केली. चौधरी यांनी कोल्हापूर विभागाचे साखर सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे यांना तातडीने अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तक्रारी व आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने ‘बिद्री’ची निवडणूक लागण्यापूर्वीच गाजू लागली आहे. संचालक मंडळाची मुदत मे २०१५ ला संपते. त्यामुळे कारखाना प्रशासनास त्याच्या अगोदर १२० किंवा १५० दिवस कच्ची मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू (पान ५ वर)
सत्तारूढ गटाने नव्याने केलेल्या १७ हजार वाढीव सभासदांचा वाद उच्च न्यायालयात सुरू आहे. तोपर्यंत घाईगडबडीत प्राथमिक मतदार यादी तयार करून ती न्यायालयात सादर करण्याचा सत्तारूढ गटाचा प्रयत्न होता. आयुक्तांनी त्याला हरकत घेतल्याने या प्रक्रि येला चाप बसला आहे.
- प्रकाश आबिटकर, आमदार
मतदार यादी तयार करण्याचा कोणत्याही संस्थेला अधिकार असतो; परंतु ती करताना कायदेशीर नियमांचे उल्लंघन होता कामा नये. बिद्री कारखान्याने ठराव गोळा करण्याची मुदत फक्त सहा दिवसच ठेवल्याचे दिसते. त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
- मधुकर चौधरी, आयुक्त, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण