बिद्री कारखान्याने ऑक्सिजन प्रकल्प उभारून पुण्याईचे काम केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:16 IST2021-07-12T04:16:21+5:302021-07-12T04:16:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सरवडे : ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा सक्षम करण्यासाठी जुलैअखेर ११ प्रकल्प कार्यान्वित होत असून त्यातून २७ टन ...

बिद्री कारखान्याने ऑक्सिजन प्रकल्प उभारून पुण्याईचे काम केले
लोकमत न्यूज नेटवर्क
सरवडे : ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा सक्षम करण्यासाठी जुलैअखेर ११ प्रकल्प कार्यान्वित होत असून त्यातून २७ टन ऑक्सिजनची उपलब्धता होणार आहे. शासनाच्या आवाहनानुसार बिद्री साखर कारखान्याने ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचे आव्हान पेलले. सहकारी क्षेत्रात जिल्ह्यात सर्वप्रथम ऑक्सिजन प्रकल्प उभारून बिद्रीने पुण्याईचे काम केले आहे. असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री व पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केले.
बिद्री (ता. कागल ) दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी चेअरमन दिनकराव जाधव होते. प्रारंभी मंत्री पाटील यांच्या हस्ते ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असून खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनेत कोल्हापूर जिल्हा पुण्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कमी वेळेत जास्त गाळप करण्याची साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. यामध्ये के. पी. पाटील यांनी उत्तम व्यवस्थापन व सचोटीने कारभार करत दराच्या बाबतीत कायमच आघाडी घेतली आहे. अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, कोरोना पार्श्वभूमीवर सामाजिक बांधीलकी या नात्याने बिद्री साखर कारखान्याने लाॅकडाऊनमधील अनंत अडचणींवर मात करत जिल्ह्यात सर्वात प्रथम ऑक्सिजन प्रकल्प पूर्ण केला. या प्रकल्पातून दररोज ९० सिलिंडरची निर्मिती होणार असून याचा फायदा गरजूंना होणार आहे. सहवीज प्रकल्पाच्या यशानंतर हाती घेतलेले विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू असून येत्या गळीत हंगामात दैनंदिन आठ हजार मे. टन उसाचे गाळप केले जाईल. विस्तारीकरणानंतर बिद्री साखर कारखाना पश्चिम महाराष्ट्रात आघाडीवर राहील. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकरराव जाधव यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमात गोकूळचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांचा कारखान्याच्या वतीने अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, गणपतराव फराकटे, धोंडीराम मगदूम, मधुकर देसाई, धनाजीराव देसाई, प्रवीण भोसले, उमेश भोईटे, युवराज वारके, एकनाथ पाटील, के. ना. पाटील, अशोक कांबळे, अर्चना विकास पाटील, नीताराणी सुनील सूर्यवंशी यांच्यासह माजी संचालक विजयसिंह मोरे, पंडितराव केणे, वसंतराव पाटील, जी. डी. पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील कांबळे, दत्ता पाटील- केनवडेकर, विश्वनाथ कुंभार, श्यामराव देसाई, रघुनाथ कुंभार, विकास पाटील मुदाळ व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आभार उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी मानले.
................
पाटील -जाधव यांचा मी संगम
के.पी. पाटील आपल्या भाषणात बिद्रीचे माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव हे माझे गुरू आहेत. तर माजी अध्यक्ष स्वर्गीय हिंदुराव पाटील यांचेही गुण माझ्यात आहेत. त्यामुळे मी पाटील -जाधव यांच्या गुणांचा संगम आहे, असे म्हणतात टाळ्यांचा कडकडाट झाला. ...... के.पी. दराचा बाॅम्ब फोडतात. नंतर फटाकड्या वाजतात
राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले के.पी. पाटील यांनी सचोटी व काटकसरीने कारभार करत उत्कृष्ट आर्थिक नियोजन करत असल्याने दराचा सर्वप्रथम बाॅम्ब फोडतात आणि नंतर जिल्ह्यात फटाकड्या वाजतात असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
फोटो
बिद्री. येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करताना पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, अध्यक्ष के. पी. पाटील व संचालक मंडळ.