भरधाव दुचाकीची ट्रकला धडक; दोघे जागीच ठार

By Admin | Updated: December 14, 2014 00:58 IST2014-12-14T00:57:56+5:302014-12-14T00:58:16+5:30

आजऱ्याजवळ दुर्घटना : मृत हुडे-चाफवडेचे

Bicycling truck hits; Both killed on the spot | भरधाव दुचाकीची ट्रकला धडक; दोघे जागीच ठार

भरधाव दुचाकीची ट्रकला धडक; दोघे जागीच ठार

आजरा : आजरा-नेसरी मार्गावर श्रृंगारवाडी फाट्यानजीक उसाच्या ट्रकला भरधाव मोटारसायकलने धडक दिल्याने बाळू बाबू राणे (वय ४२, रा. चाफवडे, ता. आजरा) व शिवराज विष्णू देसाई (३२, रा. हुडे, ता. आजरा) हे जागीच ठार झाले.
आजरा पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बाळू राणे व शिवराज देसाई हे बाजारासाठी आजऱ्याला शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आले होते. काम आटोपून ते मोटारसायकलवरून (एमएच ०९ बीएल २९९५) चाफवड्याकडे निघाले होते. याचवेळी आजऱ्याहून चंदगडच्या दिशेने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकला (एमएच १५ जी ८५१९) मोटारसायकलची पाठीमागून जोरात धडक बसली.
धडकेमध्ये मागील बाजूस बसलेला बाळू राणे जोराने फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला, तर मागील बाजूच्या लोखंडी बारला धडकल्याने चालक शिवराज जागीच ठार झाला. आजरा पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.

Web Title: Bicycling truck hits; Both killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.